scorecardresearch

लसीकरणाविरोधात थेट रस्त्यावर का उतरले या देशातले नागरिक? जाणून घ्या कारण…

सर्वेक्षणातल्या ३४ टक्के जणांचा मुळात लसीकरण करण्यालाच विरोध आहे, तर १४ टक्के नागरिकांच्या मते सरकारनं हा निर्णय घेण्यात घाई केली आहे.

Corona Vaccination Booster dose
((File Photo/AP)

जगभरात सध्या करोना आणि त्याचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची दहशत आहे. त्याविरोधात लढण्याचं लसीकरण हेच प्रभावी माध्यम असल्याचं जगभरातल्या तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. मात्र अशातच एका देशात लसीकरणाविरोधात आंदोलनं सुरू आहेत. या देशाच्या सरकारने लसीकरण सक्तीचं केलं असल्याने त्याला अनेक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे आणि रस्त्यावर येत आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.

सरकारनं केलेली लसीकरणाची सक्ती चुकीची असून हा नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करत ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाची जनता रस्त्यावर उतरली आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत जनतेकडून आंदोलनं करण्यात येत आहेत. व्हिए्न्ना सरकारनं नुकताच लसीकरणाबाबत एक नवा कायदा केला आहे, ज्यानुसार लसीकरण सर्वांना सक्तीचं केलं जाणार आहे.

या कायद्यानुसार, फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्येक नागरिकासाठी लसीकरण करून घेणं सक्तीचं असणार आहे. व्हिएन्नामध्ये सध्या करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सक्तीचं लसीकरण हाच योग्य उपाय असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. लसीकरण सक्तीचा करणारा व्हिएन्ना हा युरोपातील पहिला देश ठरला असून त्याला बहुतांश जनतेचा विरोध असल्याचं एका सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.

प्रॉफिल नावाच्या मासिकानं याच विषयासंदर्भात एक पोल आयोजित केला होता. देशात लसीकरण सक्तीचे करण्याचा सरकारचा निर्णय तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल या पोलमध्ये करण्यात आला होता. या पोलसाठी मतदान केलेल्यांपैकी ५१ टक्के नागरिकांनी लसीकरण सक्तीचं करण्याच्या प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. यापैकी ३४ टक्के जणांचा मुळात लसीकरण करण्यालाच विरोध आहे, तर १४ टक्के नागरिकांच्या मते सरकारनं हा निर्णय घेण्यात घाई केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Covid 19 vaccination vienna protest against compulsory vaccination vsk

ताज्या बातम्या