कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी सरकारने अनेक मोहिमा राबवल्या होत्या. ही मोहीम म्हणजे सावध करण्याचा, सतर्क करण्याचा, खबरदारी घेण्याचा आणि इतरांनाही वाचवण्याचा प्रयत्न होता. यातील एक प्रयत्न म्हणजे करोनाची कॉलर ट्यून. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला कॉल करतो तेव्हा तेथून प्री-कॉल ऑडिओ ऐकू येतो. या ऑडिओमध्ये तुम्ही स्वतःला आणि इतरांना करोनापासून कसे वाचवू शकता हे सांगितले आहे. यामध्ये खबरदारीची माहिती देण्यात आली आहे. पण लोकांना विचाराल तर ते या गोष्टीला कंटाळले आहेत आणि प्रत्येक वेळी तेच ऐकतात असे सांगतात. तुम्‍हाला फोन लवकरच आपत्‍कालीन स्थितीत ठेवायचा असेल, तर पूर्ण ऑडिओ वाजल्यानंतरच तो वाजतो. आता सरकार ही अडचण दूर करणार आहे. प्री-कॉल ऑडिओ लवकरच बंद होणार आहे.

वास्तविक सरकारच्या सूचनेनुसार, टेलिकॉम ऑपरेटर हा प्री-कॉल ऑडिओ वाचतात. ‘पीटीआय’च्या अहवालात असे म्हटले आहे की कोविडची जनजागृती मोहीम २ वर्षे चालवल्यानंतर सरकार करोनाची कॉलर ट्यून बंद करणार आहे.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न
girl rescued within twelve hours
अपहरण झालेल्या पाच वर्षीय मुलीची बारा तासांत सुटका

दूरसंचार विभागाला पत्र लिहिले

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दूरसंचार विभागाने यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून करोनाशी संबंधित कॉलर ट्यून आणि प्री-कॉल ऑडिओ बंद करण्याची शिफारस केली आहे. हे बंद करण्याची मागणी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि मोबाईल ग्राहकांकडूनही करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. सूत्राने सांगितले की, साथीच्या आजाराची स्थिती सुधारत असताना आरोग्य मंत्रालय ही ऑडिओ क्लिप काढून टाकण्याचा विचार करत आहे. याशिवाय कोविडविरुद्ध लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनेक मोहिमा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

आरोग्य मंत्रालयाच्या आदेशानुसार दूरसंचार ऑपरेटरला दूरसंचार विभागाने फोन कॉल लावल्यानंतर करोनाची कॉलर ट्यून सेट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कॉलर ट्यून आणि प्री-कॉल ऑडिओमध्ये, करोनापासून सावधगिरी बाळगण्यास आणि सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. २१ महिन्यांत या सेवेने आपली भूमिका चोख बजावली असून लोकांमध्ये जनजागृती करण्यात पूर्ण सेवा दिली आहे.

DoT ने आरोग्य मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की प्री-कॉल ऑडिओ आपत्कालीन परिस्थितीत कॉल करण्यास विलंब करते कारण ऑडिओ पूर्णपणे प्ले झाल्यानंतरच फोन रिंग वाजते. या ऑडिओमुळे, बँडविड्थ संसाधनांची किंमत देखील वाढते. यामुळे टेलिकॉम ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर ओव्हरलोड वाढतो, ज्यामुळे कॉलिंगला विलंब होतो. तेथून आधी ऑडिओ वाजत असताना घाईघाईने फोन करावा लागत असल्याने यामुळे ग्राहकही नाराज झाले. याबाबत ग्राहकांनी मोबाईल सेवा पुरवठादारांकडे तक्रार केली आहे. या ऑडिओला रिंग बॅक टोन देखील म्हणतात. आरटीआयच्या माध्यमातून रिंग बॅक टोन्सविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत.