देशात करोना रुग्णांची वाढ सातत्याने सुरू आहे. देशात गेल्या २४ तासांत अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या करोनापासून बचावासाठी लसीकरण आणि खबरदारी घेणे एवढेच पर्याय आहेत. महत्वाचं म्हणजे भारतातील लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण होतंय. भारतात वर्षभरात १५६ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, करोनाविरोधात लसीकरण हे सर्वात मजबूत शस्त्र असल्याचं वॉशिंग्टनमधील शास्त्रज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद यांनी एएनआयशी बोलताना म्हटलंय. तर, कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच करोना संपेल, असंही त्यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“करोना कायमस्वरूपी राहू शकत नाही, आणि तो संपेल. हा एक प्रकारचा खेळ आहे आणि या खेळात कोणीही विजेता नाही, हा ड्रॉ होणार आहे. एक वेळ येईल जेव्हा हा विषाणू लपून जाईल आणि आपण खरोखरच जिंकू. आपल्याला आपल्या मास्कच्या मागे लपून राहावं लागणार नाही, त्यापासून आपली सुटका होईल. या क्षणाच्या आपण खूप जवळ आलोय, असं मला वाटतं. जसजसे आपण या वर्षात पुढे जाऊ, तसतसं आपण लवकरच महामारीतून बाहेर येऊ,” असं डॉ. कुतुब म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid pandemic can not go on forever will end soon says us virologist dr kutub mahmoood hrc
First published on: 16-01-2022 at 11:42 IST