…म्हणून ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींनी काचेच्या पेटीत बसून पंतप्रधानांना दिली पदाची शपथ

नवीन सरकार मोठ्या कठीण काळामध्ये सत्तेत आलं आहे. आमच्यासमोर बरीच आव्हानं आहेत, असं नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणाले.

Czech President Appoints New Prime Minister From Glass Box
रविवारी पार पडला हा शपथविधी सोहळा

चेक (झेक) प्रजासत्ताकचे राष्ट्रपती मोलीस झामेन यांनी देशामदील उजव्या आघाडीचे नेते पेट्र फिएला यांची पंतप्रधान पदी नियुक्ती केली. रविवारी पार पडलेल्या या शपथविधीदरम्यान राष्ट्रपती हे काचेच्या पेटीमध्ये बसून होते. काचेच्या पेटीमधूनच राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना पदाची शपथ दिली. मात्र यामागे एक विशेष कारण आहे.

पेट्र हे उजव्या आघाडीच्या पाच पक्षांचे नेते असून त्यांनी ऑक्टोबर महिन्यात झालेली निवडणूक जिंकली होती. या निवडणुकीमध्ये सध्याचे मावळते पंतप्रधान अँण्ड्रेज बाबीस आणि सहकाऱ्यांचा पराभव झाला. नवीन सरकारसमोर सध्या करोनाचा प्रादुर्भाव आणि करोनाची नवीन लाट हा पहिला गंभीर विषय असेल. त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रातील तुटवडा हा सुद्धा नव्या सरकारसमोरील मोठा प्रश्न असणार आहे. २०२२ च्या अर्थसंकल्पामध्ये सुधारणा करण्याचं आश्वासन पेट्र यांच्या आघाडीने निवडणुक प्रचारादरम्यान दिलेलं.

“नवीन सरकार मोठ्या कठीण काळामध्ये सत्तेत आलं आहे. आमच्यासमोर बरीच आव्हानं आहेत. भविष्याच्या दृष्टीने बदल घडवणार आमचं सरकार असेल,” असं पेट्र यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंत पेट्र यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तर होईल. दरम्यान काल पार पडलेल्या शपथविधीदरम्यान राष्ट्रपतींनी काचेच्या पेटीमध्ये बसून नवीन पंतप्रधानांना शपथ दिली. राष्ट्रपतींना करोनाची लागण झाल्याने त्यांनी काचेच्या पेटीत बसून शपथ दिल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. नवीन पंतप्रधानांना शपथ देणं गरजेचं असल्याने या शपथविधीसाठी राष्ट्रपती करोनाचा संसर्ग झालेला असतानाही उपस्थित राहिले.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पेट्र यांनी जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्याचंही कौतुक केलं आहे. चेक देशामध्ये केवळ ५८.५ टक्के लोकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली आहे. युरोपीयन महासंघामधील इतर देशांमधील सरासरी लसीकरण हे ६५.८ टक्के इतके असून त्या तुलनेत या देशातील लसीकरण फारच कमी आहे, अशी माहिती युरोपीयन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अॅण्ड कंट्रोलने दिलीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covid positive czech president appoints new prime minister from glass box scsg

ताज्या बातम्या