देशात करोना महामारीची तिसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील करोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज (सोमवार) दुपारी साडेतीन वाजता विशेष बैठक घेणार आहेत.

महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेली व दमण-दीव येथील आरोग्यमंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहेत.

Gajanan Kirtikar criticizes Narendra Modi for guarding Parliament
संसद ताब्यात घ्या; पण मित्रपक्षांचाही मान राखा! शिंदे गटाचे खासदार कीर्तिकर यांचा मोदींना टोला
Bhaskar Bhagre and Bharti Pawar
दिंडोरीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांविरोधात मविआकडून शिक्षक मैदानात
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा
Suresh Khade
सांगली : आंदोलनकर्त्या कामगारांना मंत्र्यांच्या मध्यस्थीने २०० कोटींची भरपाई

आज दुपारी साडेतीन वाजता मी गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा, दादरा नगर हवेली, दमण दीव आणि महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक करणार आहे. करोनाला तोंड देण्याची तयारी व याच्याशी निगडीत अन्य मुद्य्यांवर चर्चा होईल. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

कोविड-19 च्या झपाट्याने पसरणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे बिघडत चाललेल्या देशभरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीच्या एका दिवसानंतर ही बैठक होत आहे. या बैठकीत, पीएम मोदींनी जिल्हा स्तरावर पुरेशा आरोग्य पायाभूत सुविधांची खात्री करण्याचे आणि किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण मोहीम मिशन मोडमध्ये तीव्र करण्याचे आवाहन केले होते.

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या निवेदनानुसार, मोदी म्हणाले की उच्च प्रकरणांची नोंद करणाऱ्या क्लस्टर्समध्ये सखोल नियंत्रण आणि सक्रिय पाळत ठेवणे आवश्यक आहे आणि सध्या उच्च प्रकरणे नोंदवणाऱ्या राज्यांना आवश्यक तांत्रिक सहाय्य प्रदान केले जावे. तसेच, पंतप्रधान मोदींनी संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मास्कचा वापर आणि शारीरिक अंतर या उपायांचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्याची आवश्यकता असल्याचेही अधोरेखित केले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

तर, देशात करोना बाधितांच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि या महिन्याच्या अखेरीस ते करोनाटी तिसरी लाट पीकवर असेल. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक महेंद्र अग्रवाल म्हणाले की, या काळात देशात दररोज ४ ते ८ लाख रुग्ण संख्या आढळू शकते. इतकेच नाही तर कडक निर्बंधांमुळे ही लाट काही काळानंतर नक्कीच येईल, पण नंतर ती दीर्घकाळ राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. लॉकडाऊनसारख्या निर्बंधांशिवाय करोना विषाणूचा संसर्ग थांबणार नाही, हे या अंदाजावरून स्पष्ट होते. याशिवाय गतवर्षीप्रमाणे या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार नाही.