देशभरात करोना महमारीची तिसरी लाट जरी ओसरली असली तरी देखील अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधित रूग्णांचे मृत्यू देखील सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर करोना विरोधातील लढाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता देशभरात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले जाणार आहे.

या मुलांना करोना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या बुधवारापसून म्हणजेच १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही करोनावरील लस दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या वर्षीच्या सुरूवातीला १५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Accused in Yes Bank fraud, Rs 400 Crore Fraud, Arrested After Three Years, kerala airpot arrest, ajit menon, fraud yes bank, yes bank fraud accussed arrested, fraud in yes bank, marathi news, fraud news,
येस बँकेचं ४०० कोटींचं फसवणूक प्रकरण : ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला अटक
Surya And Guru Conjunction Marathi News
वाईट काळ संपेल! १३ एप्रिलपासून ‘या’ राशींसाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडणार? २ ग्रहांची युती होताच मिळू शकतो चांगला पैसा
rbi 200 currency notes
RBI Alert: १ एप्रिलला २००० च्या नोटा स्वीकारणार नाही, आरबीआयनं केलं जाहीर!
Government, Over Rs 15 thousand Crore, Dividend, Public Sector Banks, Receive, finance, financial knowledge, financial year end, marathi news
सरकारी बँकांकडून केंद्राला १५,००० कोटींचा लाभांश शक्य

“मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे! असं आरोग्यमंत्री मांडविया यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. तसेच, ६० वर्षांवरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ‘मुलांच्या कुटुंबीयांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतो’, असे मांडवीय म्हणाले आहेत.