गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. या मतदानाच्या काही तासांपूर्वी क्रिकेटर रवींद्र जडेजानं दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. “गुजराती लोकांनो अजूनही वेळ आहे, समजून घ्या”, असं कॅप्शन जडेजाने या व्हिडीओला दिलं आहे. या जुन्या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदींवर भाष्य करताना दिसत आहेत.

“माझं हेच म्हणणं आहे की, नरेंद्र मोदी गेले, तर गुजरातही जाईल. जर नरेंद्र मोदींना तुम्ही बाजूला केलंत तर तुमचं गुजरात गेलं. हेच मी अडवानींजवळ बोललेलो आहे”, असं बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओत म्हणत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत भाजपाला मतदान करण्याचं आवाहन वेगळ्या पद्धतीनं जडेजानं केलं आहे. जडेजाची पत्नी रिवाबा उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आहेत. रिवाबा यांनी २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला होता.

nashik bjp marathi news, bjp dindori lok sabha election 2024
कोणता समाज, घटक नाराज आहे ? दिंडोरी लोकसभेसाठी भाजप निरीक्षकांकडून चाचपणी
nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
Amit Satam vs Varsha Gaikwad
“राहुल गांधी कुठे मस्ती करतो ते…”, अदाणींचा उल्लेख करताच भाजपा आमदार विधानसभेत आक्रमक; वर्षा गायकवाडांबरोबर खडाजंगी
people from Ichalkaranji will show black flags to cm eknath shinde and Minister suresh Khade for Sulkood water issue
सुळकुड पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री खाडे यांना रविवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवणार

Gujarat Election 2022: रवींद्र जडेजाची बहीण आणि पत्नी आमने-सामने, प्रचारादरम्यान केला गंभीर आरोप

गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी ८९ जागांसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यात रिवाबा यांच्यासह ७८८ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. २०१७ साली उत्तर जामनगर मधून निवडून आलेले भाजपाचे धर्मेंद्र सिंग जडेचा यांना पक्षाने तिकीट नाकारत रिवाबा यांना संधी दिली आहे.

Gujarat Elections : …म्हणून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक जिंकणं हार्दिक पटेलांसाठी असणार मोठं आव्हान!

याच जागेवर जडेजाची बहीण आणि काँग्रेस महिला आघाडीच्या प्रमुख नैनाबा जडेजा यांनी काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार केला. या जागेसाठी रवींद्र जडेजाच्या घरातील दोन महिला आमने-सामने आल्याने राजकीय चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, नैनाबा यांच्याकडून रिवाबा यांच्यावर निवडणुकीपूर्वी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. “आपल्या वहिनीचे अधिकृत नाव रिवा सिंग हरदेवसिंग सोलंकी असं आहे. त्यांच्या निवडणूक अर्जातही हेच नाव आहे. त्यांनी रवींद्र जडेजाचं नाव कंसात लिहिलं आहे. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी त्या जडेजा आडनावाचा वापर करत आहेत. लग्नाला सहा वर्षे झाली, तरीही त्यांना मतदार यादीतील आपलं नाव बदलून घेण्यास वेळ मिळाला नाही” असा आरोप नैनाबा यांनी केला आहे.