शुक्रवारी झालेल्या भीषण कार अपघातानंतर क्रिकेटपटू ऋषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मात्र, आमदार, मंत्री, अधिकारी आणि अभिनेत्यांसह चाहत्यांच्या गर्दीमुळे त्याला विश्रांती मिळत नसल्याची तक्रार करत रुग्णालय प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी मागणी ऋषभ पंतच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – ऋषभ पंतच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा

nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?

“यासंदर्भात आम्ही काळजी घेऊ

याबाबत बोलताना, “नियमानुसार रुग्णांना भेटण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी १ तसेच दुपारी ४ ते ५ अशी वेळ आखून देण्यात आली असून ऋषभ पंत क्रिकेटपटू असल्यानेच ही समस्या निर्माण होते आहे”, अशी प्रतिक्रिया रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहेत. तसेच यासंदर्भात आम्ही काळजी घेऊ, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “एवढा पैसा कमवतात मग एक ड्रायव्हर तर …”, ऋषभ पंतच्या कार अपघातावर कपिल देव यांचे मोठे वक्तव्य

“ऋषभला विश्रांतीची गरज”

“ऋषभला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया ऋषभ पंतची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय चमूतील डॉक्टरांनी दिली आहे. तसेच अपघातात झालेल्या दुखापतींमुळे त्याला अजूनही वेदना होत असून त्याच्या भेटीसाठी गर्दी न करता त्याला विश्रांतीसाठी वेळ द्यावा”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ऋषभ पंतच्या उपचारांबाबत BCCI नं दिली महत्त्वाची माहिती; ‘गरज पडल्यास…’

दरम्यान, आतापर्यंत अभिनेता अनुपम खेर, अनिल कपूर, क्रिकेटपटू नितीश राणा, खानपूरचे आमदार उमेश कुमार याचबरोबर स्थानिक राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनीही रुग्णालयात जाऊन ऋषभ पंतची भेट घेतली आहे.