Crime News : एका प्रवासी मजुराची गोमांस खाल्ल्याच्या संशयावरुन लोकांनी हत्या केली. गोमांस खाल्ल्याचा संशय आल्याने या मजुराला जमावाने मारहाण केली. या मारहाणीत या मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी गोरक्षा समितीच्या पाच जणांना अटक केली. या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

मजूर कुठला आहे? घटना कुठे घडली?

साबिर मलिक असं मारहाणीत मृत्यू झालेल्या मजुराचं नाव आहे. तो पश्चिम बंगालचा आहे. हरियाणा या ठिकाणी चरखी दादरी भागात तो आला होता. त्यावेळी त्याने गोमांस खाल्लं असावं या संशयातून त्याला मारहाण ( Crime News ) करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी ही माहिती दिली की हरियाणा चरखी दादरी भागात हा मजूर आला होता. याने गोमांस खाल्लं असा संशय आल्याने जमावाने या मजुराला आणि आणखी एकाला बेदम मारहाण केली. या घटनेत साबिर मलिक याचा मृत्यू ( Crime News ) झाला. ही घटना २७ ऑगस्टला घडली आहे. दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्या प्रमाणे २७ तारखेलाच सबिरची हत्या करण्यात आली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

Musheer Khan Road Accident Health Update His Car Overturned After Hitting Divider
Musheer Khan Health Update: मुशीर खानचा अपघातही ऋषभ पंतप्रमाणेच, अधिकृत माहिती आली समोर, मानेला फ्रॅक्चर असून मुंबईत होणार पुढील उपचार
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
police registered case for threat call of planted bomb in haji ali dargah office
हाजी अली दर्गा बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या फोनकॉलनंतर खळबळ; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
55 lakh extortion demand from municipal engineer
पालिका अभियंत्याकडे ५५ लाखांच्या खंडणीची मागणी; सहा जणांना अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई
mcoca action against NK gang leader and accomplices in Yerwada
येरवड्यातील एन.के. गँगच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
gauraksha worker beaten up kalyan marathi news
कल्याणमध्ये अ. भा. गौ रक्षा महासंघाच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून तबेल्यात बेदम मारहाण, जिवंत गाडून टाकण्याची आरोपींची धमकी
Python
Python in Chandrapur : बटाटाच्या पेटीत वेटोळे घालून बसला होता भलामोठा अजगर, कर्मचाऱ्याने पेटी उघडताच…

हे पण वाचा- Rajkot News : ‘माफ कर आई, मी तुला मारलं, तुझी आठवण येते’; आईची हत्या केल्यानंतर मुलाने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत फोटो केला शेअर

पोलिसांनी काय माहिती दिली आहे?

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, गोरक्षा समितीचे अभिषेक, मोहित, रविंदर, कमलजीत, साहिल यांनी साबिर मलिकला प्लास्टिकच्या बॉटल विकण्याच्या निमित्ताने दुकानात बोलवलं होतं. त्यानंतर जेव्हा साबिर तिथे आला तेव्हा त्याला जबरदस्त मारहाण ( Crime News ) केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात दोन किशोरवयीन मुलांचाही समावेश आहे. जेव्हा साबिर मलिकला मारहाण ( Crime News ) करण्यात आली तेव्हा काही माणसं मधे पडली त्यानंतर या लोकांनी साबिरला सोडलं आणि तो थोडा पुढे गेल्यावर त्याला त्या परिसरात गाठलं आणि तिथेही मारहाण केली. या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन किशोरवयीन मुलांचाही समावेश आहे.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी म्हणाले की साबिर मलिकला ते लोक मारत होते, त्या सगळ्यांनी त्याला मारहाण केली. साबिर मलिक बाबत पोलीस म्हणाले की तो प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करुन त्या भंगारमध्ये विकायचा आणि त्याचा चरितार्थ चालवत होता. आता त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागच्या दहा वर्षांपासून हरियाणात या प्रकारे हत्या करण्याचे आणि मॉब लिंचिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. २०२३ मध्ये दोन मुस्लिम माणसांना कारमध्ये बसवून जाळण्यात आल्याची घटना घडली होती. आता एका मुस्लिम मजुराला बोलवून त्याची हत्या करण्यात आली आहे.