दिल्लीतील सामूहिक बलात्कारातील पीडित २३ वर्षीय मृत तरुणीची ओळख दर्शवणारी माहिती प्रसिद्ध केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका इंग्रजी दैनिकाविरोधात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
बलात्कारित पीडिताची माहिती प्रसिद्ध केल्याच्या गुन्ह्य़ासाठी कलम २२८- ए नुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यानुसार वसंत विहार पोलीस ठाण्यात इंग्रजी दैनिकाच्या संपादक, प्रकाशक, मुद्रक आणि दोन वार्ताहरांसह छायाचित्रकाराविरोधात बलात्कारातील मृत तरुणीची माहिती छापल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गुन्ह्य़ात दंडासह  दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
‘बलात्काऱ्यांना दयेच्या अर्जाची मुभा नको’
सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाने देशाला खडबडून जाग आणणाऱ्या तरुणीवर अंत्यसंस्कार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर बलात्कार आणि खून करणाऱ्या गुन्हेगाराला दयेचा अर्ज करण्याची मुभाच असू नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. राष्ट्रपतीपदी प्रतिभाताई पाटील असताना त्यांनी मंजूर केलेल्या दयेच्या अर्जात बलात्काऱ्यांनाही माफी मिळाली होती.

case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
college girl commit suicide over love affair
प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या; बिबवेवाडीतील घटना
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द