पीककर्जावरील ६६० कोटींचे व्याज सरकारकडून माफ, मंत्रिमंडळाचा निर्णय

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज माफ

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi, china global times india demonetization narendra modi comparison mars
चीनच्या वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज सरकारने माफ  केले आहे. एकूण ६६०.५ कोटी रुपयांचे व्याज सरकारने माफ केले आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बॅंकेकडून अल्पमुदतीचे कर्ज घेतले होते त्यावर व्याज लागणार नसल्याचे मंत्रिमंडळाने म्हटले आहे. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहे.

नोटाबंदीनंतर सर्वाधिक जास्त फटका हा मजूर आणि शेतकरी वर्गाला बसला. त्यामुळेच सरकारने दोन महिन्याचे व्याज न वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच सरकारने नाबार्डला ४०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोटाबंदीच्या काळात अल्पमुदत पीककर्जावर व्याज भरले आहेत त्यांची व्याजाची रक्कम परत केली जाणार असल्याचेही कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटले आहे. ५०० आणि १००० च्या नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांना पैसे भरण्यास त्रास सहन करावा लागला. रबी पीकांसाठी शेतकऱ्यांना कर्ज उचलावे लागले. त्या कर्जावरील दोन महिन्याचे व्याज पूर्णपणे माफ करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

क्योटो प्रोटोकॉलच्या हरित वायूच्या उत्सर्जन कराराच्या मुदतवाढीस मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले आहे.  तसेच अनिसाबाद येथे ११.३५ एकर जागा विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यापुढे आयआयएममध्ये पदविका ऐवजी पदवी प्रदान केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आयआयएममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा ऐवजी डिग्री मिळणार आहे. प्रगती मैदान येथे सांस्कृतिक केंद्रासाठी २,२५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Crop loan waiver india narendra modi cabinet meeting iim bill draft passed