scorecardresearch

Premium

भारतीय लष्करात आता ‘क्रॉस पोस्टिंग’, तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची होणार अदलाबदल!

Cross staffing of Army officers : ४० लष्करी अधिकाऱ्यांची एक मोठी तुकडी लवकरच भारतीय हवाईदल आणि नौदलात तैनात केली जाणार आहे. येथेही ते लष्कराप्रमाणेच काम करणार आहेत.

Cross staffing of Army officers to IAF Navy soon
तिन्ही दलांतील अधिकाऱ्यांना मिळणार बदली (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

भारतीय सैन्यात एकात्मिता आणण्यासाठी भारतीय लष्करात आता क्रॉस पोस्टिंग योजना राबवण्यात येणार आहे. यामुळे तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार आहे. ४० लष्करी अधिकाऱ्यांची एक मोठी तुकडी लवकरच भारतीय हवाईदल आणि नौदलात तैनात केली जाणार आहे. येथेही ते लष्कराप्रमाणेच काम करणार आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

मेजर आणि लेफ्टनंट कर्नलच्या पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची क्रॉस-स्टाफिंग पोस्टिंग होणार आहे. हवाईदल आणि नौदलातील अधिकाऱ्यांचेही लष्करी विभागात नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

युवीए, शस्त्र प्रणाली, रडार, वाहने, दूरसंचार उपकरणे या तिन्ही सेवांमध्ये समान आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना मिसाईल युनिट्समध्ये युएव्ही, लॉजिस्टिक, दुरुस्ती आणि रिकव्हरी, साहित्य आणि पुरवठा व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे.

आतापर्यंत अशी काही मोजक्याच पोस्टिंग झाल्या आहेत, जिथे काही लष्करी अधिकारी नौदल ऑपरेशन्समध्ये किंवा आयएएफमध्ये फ्लाईंग रोलमध्ये निवडलेल्या भूमिकांमध्ये नियुक्त करण्यात आले होते. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, “क्रॉस फंक्शनल टीम तयार करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे लष्करात एकात्मता जोपासली जाऊ शकतो. तसंच, अधिकारी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच प्रत्येक सेवेतील नियम, कार्यपद्धती आणि बारकावे शिकू शकतील.”

“क्रॉस स्टाफिंग पोस्टिंगमुळे तिन्ही सेवेतील कार्य अधिकाऱ्यांना समजून घेता येणार आहे. तसंच, यामुळे तिन्ही दलांमध्ये समन्वय राखला जाईल. यामुळे अहवाल प्रक्रिया, खरेदी, पुरवठा साखळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने विविध आव्हानांवर मात करण्यास मदत होईल”, असंही एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 09:16 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×