उधमपूर/जम्मू : जम्मू-कश्मीरच्या उधमपूरमध्ये महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कमांडंटला अटक करण्यात आली. मात्र,लगेच जामीनही मंजूर करण्यात आला.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की बटाल बलियान येथील ‘सीआरपीएफ’ युनिटच्या साहाय्यक ‘कमांडंट’ महिलेने ‘कमांडंट’ सुरिंदर सिंग राणा यांच्यावर तिचा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. रविवारी तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार राणांविरुद्ध उधमपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उधमपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी सांगितले, की आरोपीस पोलिसांनी अटक केली होती. नंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.



