ईदच्या सणाला काश्मीरमध्ये दहा जिल्हय़ांत संचारबंदी

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अधिवेशन न्यूयॉर्कमध्ये आज होत आहे.

 

गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच काश्मीरमधील दहा जिल्हय़ांत ईदच्या दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली असून, हेलिकॉप्टर्स व ड्रोन विमानांनी टेहळणी करण्यात आली. जास्त संख्येने लोकांनी जमण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, फुटीरतावाद्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अधिवेशन न्यूयॉर्कमध्ये आज होत आहे. लष्कराला सज्ज राहण्यास सांगण्यात आले असून, दोन महिन्यांतील हिंसाचारात काश्मीरमध्ये ७५ जण ठार झाले आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. लष्कराच्या तुकडय़ा ग्रामीण भागात ठेवल्या आहेत. मध्यरात्रीपासूनच संचारबंदी लागू केली आहे. ईदच्या सणानिमित्ताने गर्दी होणार असून त्यात हिंसाचाराची भीती आहे.

१९९०पासून काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू असला तरी या वेळच्या आंदोलनात महिला व मुले आघाडीवर आहेत.

हेलिकॉप्टर्स व ड्रोन विमाने आकाशातून नजर ठेवत असून, लोक कुठे एकत्र जमतात याचा अंदाज घेतला जात आहे.

महिला व मुलांचा संरक्षक ढाल म्हणून वापर केला जात आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.  गेल्या २६ वर्षांच्या दहशतवादी इतिहासात प्रथमच ईदचा मेळावा ईदगाह व हजरतबल येथे घेण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. लोकांना स्थानिक मशिदींमध्ये जाऊन नमाज पढण्याची परवानगी दिली आहे.  सरकारने इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिले असून बीएसएनएलची सेवा चालू राहणार आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी इतर कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद केली आहे. एअरटेल, एअरसेल, व्होडाफोन व रिलायन्स टेलिकॉम यांनी सेवा बंद केल्या आहेत. पोलीस, लष्कर व सरकारी अधिकारी पोस्टपेड बीएसएनएल सेवा वापरत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Curfew in kashmir in occasion of eid

ताज्या बातम्या