“रोटी स्वस्त करा”… सांगण्याची वेळ आली पाक पंतप्रधानांवर

पाकिस्तानच्या विविध भागांत नान १२ ते १५ रूपयाला, तर रोटी १० ते १२ रूपयांना मिळत आहे.

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तानी अर्थव्यवस्थेची घसरगुंडी झाली असून महागाईशी तोंड देताना पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या नाकीनऊ आले आहेत. त्यातच देशभरात नान आणि रोटीच्या वाढलेल्या किंमती सरकारसाठी डोकेदुखी ठरली आहे. आता या किंमती कमी कराव्यात अशी सूचना पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. दरम्यान, या महागाईला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

दहशतवादापासून ते भ्रष्टाचारापर्यंतच्या विविध समस्यांमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या रसातळाली गेली आहे. त्यात महागाईने भर घातली असून, नान व रोटीच्या किंमतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या पाकिस्तानच्या विविध भागांत नान १२ ते १५ रूपयाला, तर रोटी १० ते १२ रूपयांना मिळत आहे. पाकिस्तान सरकारने स्वयंपाकाचा गॅस, इंधनाचे दर वाढवले तसेच धान्याच्या किमतीही वाढल्या परिणामी नान आणि रोटीचे भाव वाढले होते. या भाववाढीपूर्वी नान ८ ते १० रूपये, तर रोटी ७ ते ८ रूपयांना मिळत होती.

नान आणि रोटीचे भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन्हीचे दर पूर्ववत करण्याची सक्तीची सूचना जारी केली आहे. तसेच यासंदर्भात योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश आर्थिक समन्वय समितीला दिले आहेत, अशी माहिती विशेष माहिती सल्लागार डॉ. फारूक आशिक अवान यांनी दिली. इम्रान खान यांच्या सूचनानंतर आर्थिक समन्वय समितीने प्रांत प्रशासनांना नान-रोटीच्या किमती करण्याच्या सूचना केल्या आहेत. नान व रोटी स्वस्त न झाल्यास सरकारकडून देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात येईल असा इशाराही इम्रान खान सरकारने दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cut roti naan prices pakistan pm asked to provincial governments bmh

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या