Cyber Crime : आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार सध्या समोर येत असून सर्वच स्तरातील लोकांना गंडा घातला जातोय. एका उच्चशिक्षित जोडप्याला चक्क १.५३ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. परंतु, बंगळुरूमधील पूर्व विभाग सायबर क्राइम पोलिसांनी १.४ कोटी रुपये परत मिळवले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बंगळुरुतील बनसवाडी येथे राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर जोडप्याने जास्त परतावा मिळेल या आमिषाने गुंतवणूक केली होती. युकेमध्ये कार्यरत असलेल्या एका स्कॅममध्ये ही गुंतवणूक करण्यात आली होती. या स्कॅममधून मिळालेल्या पैशांचा गैरव्यवहार करण्याकरता उत्तर भारतातील लोकांकडून खोट्या खात्यांचं नेटवर्क वापरलं जात होतं. हा व्यवहार खरा असल्याचं भासवण्यासाठी त्यांनी एक बनावट वेबसाईटही तयार केली होती. या वेबसाईटवर त्यांना त्यांच्या गुतंवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याची रक्कम दिसत होती.

Kolkata Doctor Murder Case
Kolkata Doctor Murder : डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून खून; इयरबड्सच्या तुकड्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Vinesh Phogat Latest News
Vinesh Phogat Rajyasabha Seat: फक्त ४ दिवसांच्या फरकामुळे विनेश फोगटला राज्यसभा उमेदवारीचीही हुलकावणी; वाचा नियम काय सांगतो!
sheikh hasina latest news in india
Bangladesh Political Crisis: “जर भारताऐवजी दुसरा कुठला देश असता तर…”, शेख हसीनांना आश्रय दिल्यावरून BNP पक्षाची नाराजी; म्हणाले, “संताप स्वाभाविकच”!
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Vinesh Phogat Disqualification Appeal Updates Paris Olympics 2024 in Marathi
Vinesh Phogat Hearing in CAS: विनेश फोगटला रौप्य पदक देता येणं शक्य नाही? IOC प्रमुखांचा स्पष्ट नकार, म्हणाले…
hindenburg research post on india
Hindenburg Research : भारतात लवकरच काहीतरी मोठं घडणार? हिंडेनबर्ग रिसर्चच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण!
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?

हेही वाचा >> Serial Killer Arrested: १४ महिन्यांत ९ महिलांचा खून करणाऱ्या सिरीयल किलरला अखेर अटक; वेब सीरीजच्या कथेप्रमाणे आहे शोधमोहिमेचा थरार

बनावट वेबसाईटने केलं ब्लॉग

त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याने या जोडप्याने आनंद व्यक्त केला. त्यानंतर काही महिन्यांनी या परताव्यातील काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. परंतु,बनावट वेबसाईटने त्यांना ब्लॉक करून टाकलं. त्यांना या वेबसाईटच्या माध्यमातून पैसे काढता येत नव्हते. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला.

५० हून अधिक खाती गोठवली

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, या जोडप्याने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने तपास करून बँक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मनीट्रेलचा पर्दाफाश केला. या घोटाळ्यात गुंतलेली ५० हून अधिक खाती गोठवली गेली. या कारवाईमुळे त्यांना चोरीला गेलेल्या निधीचा बराचसा भाग परत मिळवता आला आहे.

बँक अधिकाऱ्यांशी समन्वय साधला

“प्रत्येक सायबर गुन्ह्यासाठी तपास पथक तीन नियमांचं पालन करतं. पैशांच्या व्यवहाराचा माग काढणे, खाती ब्लॉक करणे, तक्रारदाराकडून वेळेवर माहिती मिळवे आणि गोल्डन अवर्समधअये तक्रार नोंदवणे. या व्यतिरिक्त काम जलद पूर्ण करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांशी समन्वय आणि संबंध राखणे आवश्यक आहे”, असं एका पोलीस अधिकाऱ्याने दि हिंदूला सांगितले.