Cyber Crime : आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार सध्या समोर येत असून सर्वच स्तरातील लोकांना गंडा घातला जातोय. एका उच्चशिक्षित जोडप्याला चक्क १.५३ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. परंतु, बंगळुरूमधील पूर्व विभाग सायबर क्राइम पोलिसांनी १.४ कोटी रुपये परत मिळवले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. बंगळुरुतील बनसवाडी येथे राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर जोडप्याने जास्त परतावा मिळेल या आमिषाने गुंतवणूक केली होती. युकेमध्ये कार्यरत असलेल्या एका स्कॅममध्ये ही गुंतवणूक करण्यात आली होती. या स्कॅममधून मिळालेल्या पैशांचा गैरव्यवहार करण्याकरता उत्तर भारतातील लोकांकडून खोट्या खात्यांचं नेटवर्क वापरलं जात होतं. हा व्यवहार खरा असल्याचं भासवण्यासाठी त्यांनी एक बनावट वेबसाईटही तयार केली होती. या वेबसाईटवर त्यांना त्यांच्या गुतंवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याची रक्कम दिसत होती. हेही वाचा >> Serial Killer Arrested: १४ महिन्यांत ९ महिलांचा खून करणाऱ्या सिरीयल किलरला अखेर अटक; वेब सीरीजच्या कथेप्रमाणे आहे शोधमोहिमेचा थरार बनावट वेबसाईटने केलं ब्लॉग त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याने या जोडप्याने आनंद व्यक्त केला. त्यानंतर काही महिन्यांनी या परताव्यातील काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. परंतु,बनावट वेबसाईटने त्यांना ब्लॉक करून टाकलं. त्यांना या वेबसाईटच्या माध्यमातून पैसे काढता येत नव्हते. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला. ५० हून अधिक खाती गोठवली आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, या जोडप्याने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने तपास करून बँक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मनीट्रेलचा पर्दाफाश केला. या घोटाळ्यात गुंतलेली ५० हून अधिक खाती गोठवली गेली. या कारवाईमुळे त्यांना चोरीला गेलेल्या निधीचा बराचसा भाग परत मिळवता आला आहे. बँक अधिकाऱ्यांशी समन्वय साधला "प्रत्येक सायबर गुन्ह्यासाठी तपास पथक तीन नियमांचं पालन करतं. पैशांच्या व्यवहाराचा माग काढणे, खाती ब्लॉक करणे, तक्रारदाराकडून वेळेवर माहिती मिळवे आणि गोल्डन अवर्समधअये तक्रार नोंदवणे. या व्यतिरिक्त काम जलद पूर्ण करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांशी समन्वय आणि संबंध राखणे आवश्यक आहे", असं एका पोलीस अधिकाऱ्याने दि हिंदूला सांगितले.