Cyclone Fengal Video : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर फेंगल या चक्रीवादळात झाले आहे. तसेच आज (३० नोव्हेंबर) हे चक्रीवादळ जमिनीकडे सरकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यंदाच्या मान्सूननंतर बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे हे दुसरे चक्रीवादळ आहे. दरम्यान या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक अशी सर्व खबरदारी घेतली जात आहे.

फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक किनारी भागातील हवामानात बदल झाला असून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत किनारपट्टी भागात धडकणार आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

फेंगल हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तीव्र होत असून पुद्दुचेरी जवळच्या भूभागाकडे सरकत आहे. यामुळे तामिळनाडूच्या प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच सुरक्षा उपाय देखील लागू केले जात आहेत. भूभागाकडे येत असलेल्या वादळामुळे मुसळधार पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत. याबरोबरच राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर आयटी कंपन्यांनी कर्मचार्‍यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरू करण्याची विनंती केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत तामिळनाडू सरकारने चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेज ३० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. फेंगल चक्रि‍वादळाच्या पार्श्वभूमीवर ही तयारी करण्यात आली आहे. हे चक्रीवादळ आज दुपारपर्यंत ९० किलोमिटर प्रति तास वेगाने जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे.

दरम्यान फेंगल हे वादळ २९ नोव्हेंबर रोजी तीव्र चक्रीवादळात रुपांतरीत झाले आहे. दरम्यान दुपारच्या सुमारास पुद्दुचेरीजवळ कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान हे चक्रीवादळ जमिनीवर धडकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच या वादळामुळे शनिवारी ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहतील आणि या वाऱ्याची गती ९० किमी प्रतितासपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात येत्या काही तासांत मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून योग्य ती घबरदारी घेतली जात आहे. तयारीचा भाग म्हणून तामिळनाडू महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यभरात २,२२९ मदत शिबिरे स्थापन केली आहेत. आपत्तीच्या काळात निवारा आवश्यक असणाऱ्यांसाठी ही सोय करण्यात आली आहे. याबरोबरच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना देखील या प्रभावित जिल्ह्यांमध्ये तयार ठेवण्यात आले आहे.

चक्रीवादळाचा जोराचा वारा आणि खवळलेला समुद्र यामुळे प्रशासकीय अधिकार्‍यांनी मच्छीमारांना किनार्‍यावर राहण्याचा सल्ला दिला आहे. जोरदार वाऱ्यामुळे धोका निर्माण होऊ नये यासाठी तामिळनाडू सरकारने बांधकाम कंपन्यांना धोकादायक यंत्रसामग्री सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे क्रेन आणि इतर यंत्र खाली घेतली जात आहे. तसेच वस्तू कोसळल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी होर्डिंग्ज आणि जाहिरातींचे मोठे बोर्ड मजबूतपणे बांधून ठेवले जात आहेत किंवा काढले जात आहेत.

वादळाचा प्रभाव किनारी भागात सर्वात गंभीर असणार आहे, यामुळे हवामान विभागाने येत्या काही दिवसांत राज्याच्या इतर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. एक डिसेंबर रोजी चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अंतर्गत भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळाचा प्रभाव तीन डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे या काळात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा>> Video: “मोदींकडून इतरांशी कसं वागायचं ते शिकलो”, भाजपा खासदाराची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले…

u

चक्रि‍वादळांना नाव कसं दिलं जातं?

उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांना नावे देण्याची प्रक्रिया ही जागतिक हवामान संस्थेकडून (WMO) आशिया आणि पॅसिफिक पॅनलसाठीच्या आर्थिक आणि समाजिक आयोगाच्या (ESCAP) मदतीने केले जाते. ओमान येथे २००० मध्ये पार पडलेल्या या पॅनेलच्या २७व्या अधिवेशनादरम्यान, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नावे देण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला ही नावे सुचवणाऱ्या गटामध्ये आठ देशांचा समावेश होता. त्यानंतर काही काळाने इतर आणखी पाच देशांची भर यामध्ये पडली आहे. या यादीमध्ये भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार आणि सौदी अरेबियासह उत्तर हिंद महासागराच्या आसपासच्या देशांचा समावेश आहे.

हेही वाचा>> शाही मशीद सर्वेक्षणास स्थगिती, संभल हिंसाचार ; उत्तर प्रदेश सरकारला शांतता राखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

चक्रि‍वादळाला फेंगल नाव का दिले?

या चक्रि‍वादळाला फेंगल हे नाव सौदी अरेबिया या देशाने दिले आहे. ‘फेंगल’ हे नावदेखील अरबी भाषेतील आहे. डब्लूएमओने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे या पॅनलमधील प्रत्येक देश चक्रीवादळासाठी नावे सुचवतात. ज्यांचा वापर त्या भागात तयार होणाऱ्या प्रत्येक नवीन वादळाला क्रमाने देण्यासाठी केला जातो. एखाद्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळासाठी एखादे नाव वापरल्यास ते या यादीतून काढून टाकले जाते. भविष्यातील वादळासाठी पुन्हा ते नाव वापरले जात नाही. नवी दिल्लीतील रीजनल स्पेशलाइज्ड मेटिऑलॉजिकल सेंटर (RSMC) सह अशाच जगभरातील इतर केंद्राद्वारे वापरल्या जाणाऱ्या नावाचा आधी वापर झाला नसल्याची खात्री केल्यानंतर अस्सल आणि वेगळी नावे निवडली जातात.

Story img Loader