scorecardresearch

Cyclone Mandous : ‘मंदौस’ चक्रीवादळामुळे चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

मंडूस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे चेन्नईसह तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

Cyclone Mandous : ‘मंदौस’ चक्रीवादळामुळे चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
फोटो सौजन्य – द इंडियन एक्सप्रेस

‘मंदौस’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाने तामिळनाडूची किनारपट्टी ओलांडली असून ते वायव्य दिशेने पुढे जात असल्याने या भागात ५५ ते ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहताना दिसून येत आहेच, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच संध्याकाळपर्यंत या वाऱ्यांची गती मंदावणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी पतीची बळजबरी! Sex Video शूट करुन ब्लॅकमेलिंग; घरातील कुड्यांमध्ये लावलेली गांजाची रोपटी

चेन्नईत मुसळधार पाऊस

दरम्यान, ‘मंदौस’ चक्रीवादळामुळे चेन्नईसह तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे चेन्नईच्या पट्टीपक्कम आणि अरुंबक्कम भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हेही वाचा – न्यायवृंदाचे संभाव्य निर्णय जाहीर करता येणार नाहीत; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

आंद्रप्रदेशमध्येही सतर्कतेचा इशारा

तामिळनाडूप्रमाणेच आंध्रप्रदेशातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या वादळामुळे आंद्रप्रदेशमध्ये मुसळधार पासून होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 12:43 IST

संबंधित बातम्या