…अन् त्या दबंग महिला IPS अधिकाऱ्याला भेटल्यानंतर दिग्दर्शकाने तिच्या कामगिरीवर सिनेमा तयार केला!

अथक परिश्रम आणि अभ्यासानंतर त्यांनी २०११ साली UPSC परिक्षेत देशभरात १९१ वा क्रमांक पटकावला.

‘जय गंगाजल’ नावाचा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का? त्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राने एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ही अधिकारी कोणालाही घाबरत नाही, मोठमोठ्या गुंडांना चांगलाच धडा शिकवते. प्रियांका चोप्राचं हे पात्र काल्पनिक नसून ते एका महिला अधिकाऱ्यावर आधारीत आहे. तिच्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहात.

‘जय गंगाजल’ चित्रपटात प्रियांका चोप्राने ज्या दबंग महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावली आहे, ती अधिकारी IPS ईशा पंत. ईशा पंत या अत्यंत धाडसी आणि इमानदार अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म २३ जून १९८४ रोजी झाला. ईशा यांना तीन बहिणी असून त्या चौघींच्यात सर्वात लहान आहेत. आपल्या बहिणीकडून प्रेरणा घेऊन त्यांनी पोलीस दलात जाण्याचा निर्णय घेतला. अथक परिश्रम आणि अभ्यासानंतर त्यांनी २०११ साली UPSC परिक्षेत देशभरात १९१ वा क्रमांक पटकावला. त्यानंतर त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमधून प्रशिक्षण घेतलं. ईशा यांना मध्यप्रदेश कॅडर मिळालं आणि त्यांना जबलपूरमध्ये पोस्टींग देण्यात आलं.

ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा…

२०१२ मध्ये त्यांना बेस्ट ऑलराऊंडर इंडियन पोलीस सर्विस प्रोबेशन हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या. त्यांच्या कामगिरीची चर्चा बॉलिवूडमध्येही होऊ लागली. त्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ईशा यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि आपल्या ‘जय गंगाजल’ या चित्रपटातून त्यांचं व्यक्तिमत्त्व मोठ्या पडद्यावर आणण्याचा निर्णय घेतला. ईशा यांच्याबरोबर झा यांनी ४ तास चर्चा केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dabang lady officer ips isha pant story film director reached office to take inspiration vsk

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या