Dadasaheb Phalke Award Asha Parekh Distribution National Film Awards President droupadi murmu ysh 95 | Loksatta

आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण

विज्ञान भवनात झालेल्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
ज्येष्ठ अभिनेत्या आशा पारेख यांना शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पीटीआय, नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने शुक्रवारी सन्मानित करण्यात आले. येथील विज्ञान भवनात झालेल्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या की, ‘‘अधिक चांगला समाज आणि देश घडवण्यामध्ये चित्रपटांचे योगदान मोठे असते. दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे अन्य कोणत्याही माध्यमापेक्षा त्याचा प्रभाव अधिक असतो.’’

पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना  राष्ट्रपती   मुर्मू  म्हणाल्या की, ‘‘आशा पारेख यांचे चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे. प्रेक्षकांकडून त्यांना भरभरून प्रेम मिळाले.  त्यांचा सत्कार हा सर्व स्वतंत्र स्त्रीशक्तीचा सन्मान आहे.’’ यावेळी अभिनेते अजय देवगण, दाक्षिणात्य अभिनेता सुरिया, त्याची पत्नी अभिनेत्री ज्योतिका, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबई-गांधीनगर ‘वंदे भारत’ आजपासून; शहरेच भारताचे भविष्य घडवतील : पंतप्रधान मोदी

संबंधित बातम्या

‘I Have Got News’, श्रद्धाचं शेवटचं चॅट आलं समोर, मृत्यूच्या काही तास आधीच मित्राला पाठवला होता मेसेज
रामदेव बाबांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन महुआ मोईत्रांची खोचक टीका; म्हणाल्या, “आता मला कळलं तुम्ही त्यावेळी महिलेच्या…”
“एवढं वाटतं तर केंद्राकडे फाईल पाठवूच नका, तुमचं तुम्हीच…”, न्यायाधीश नियुक्तीवरून केंद्रीय मंत्री आक्रमक; ‘कॉलेजियम’वर टीकास्र!
व्यापारी संघटनांचा निर्मला सीतारमण यांच्या ऑनलाईन बैठकीवर बहिष्कार; म्हणाले, “हा तर विनोद…!”
विश्लेषण: खुद्द अमिताभ बच्चन यांचीही चिंता वाढवणारा ‘पर्सनॅलिटी राईट’ नेमका आहे तरी काय? बिग बींना का मागावी लागली कोर्टाकडे दाद?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Smartphone Tips and Tricks: तुम्हालाही स्मार्टफोनमध्ये खाजगी फोटो, व्हिडीओ लपवायचे आहे? ‘या’ सोप्या पद्धतीने तयार करा ‘हिडन फोल्डर’
FIFA World Cup 2022; इंग्लंड-वेल्सचे चाहते एकमेकांसोबत भिडले; खुर्च्या आणि लाथांनी केली मारहाण, पाहा व्हिडिओ
“मन भरलं म्हणून…” घटस्फोटाच्या चर्चांवरुन ट्रोल करणाऱ्यांना मानसी नाईकचे सडेतोड उत्तर
Viral Video: चक्क चालत चालत त्याने पार्क केला ट्रक; व्हिडीओ पाहून नेटकरी पडले बुचकळ्यात
पुणे: कांदा, टोमॅटो, फ्लाॅवर, कोबी, घेवड्याच्या दरात घट