पीटीआय, नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने शुक्रवारी सन्मानित करण्यात आले. येथील विज्ञान भवनात झालेल्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या की, ‘‘अधिक चांगला समाज आणि देश घडवण्यामध्ये चित्रपटांचे योगदान मोठे असते. दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे अन्य कोणत्याही माध्यमापेक्षा त्याचा प्रभाव अधिक असतो.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना  राष्ट्रपती   मुर्मू  म्हणाल्या की, ‘‘आशा पारेख यांचे चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे. प्रेक्षकांकडून त्यांना भरभरून प्रेम मिळाले.  त्यांचा सत्कार हा सर्व स्वतंत्र स्त्रीशक्तीचा सन्मान आहे.’’ यावेळी अभिनेते अजय देवगण, दाक्षिणात्य अभिनेता सुरिया, त्याची पत्नी अभिनेत्री ज्योतिका, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadasaheb phalke award asha parekh distribution national film awards president droupadi murmu ysh
First published on: 01-10-2022 at 01:18 IST