दादरी येथे घडलेला प्रकार संपूर्ण देशासाठी लज्जास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेचे इतर कशानेही झाले नसेल, इतके नुकसान दादरी घटनेमुळे झाल्याची प्रतिक्रिया रालोआतील घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाकडून शनिवारी व्यक्त करण्यात आली. दादरीसारख्या घटनेचा शक्य तितक्या जोरदारपणे निषेध होणे गरजेचे आहे, असे शिरोमणी अकाली दलाचे खासदार नरेश गुजराल यांनी सांगितले. या घटनेनंतर अनेकांकडून बेताल वक्तव्ये करण्यात आली, त्यांनी मोदींच्या बोलण्याकडेही लक्ष दिले नाही. मात्र, या लोकांविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही कारवाई झाली असती तर संघ परिवारातील सगळ्या घटकांना योग्य तो संदेश गेला असता, असे गुजराल यांनी म्हटले. सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर बेजबाबदारपणे बोलणाऱ्या व्यक्ती आहेत. यामध्ये संघाशी संबंधित असलेल्या अनेक मंत्री, नेते आणि इतरांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadri lynching damaging pm modi more than anybody else shiromani akali dal
First published on: 17-10-2015 at 17:19 IST