समाजवादी पक्ष दलित आणि मागासवर्गीयांमध्ये जन्मलेल्या महापुरुषांचा अवमान करत असल्याचा आरोप बसपा प्रमुख मायावती यांनी सोमवारी केला. या समुदायांनी अखिलेश यादव यांच्या पक्षाकडून कोणतीही अपेक्षा करू नये, असेही सांगितले. सपाचे सरकार असताना जातीय द्वेषामुळे राज्यात अनेक संस्था आणि योजनांची नावे बदलण्यात आली होती, असेही त्या म्हणाल्या.

“सपा सुरुवातीपासूनच दलित आणि मागासवर्गीयांमध्ये जन्मलेल्या महान संत, गुरू आणि महापुरुषांचा अवमान करत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे फैजाबाद जिल्ह्यातून निर्माण झालेला नवा आंबेडकर नगर जिल्हा. त्यांनी याला सुद्धा विरोध केला. भदोही हा संत रविदास नगरमधील एक नवीन जिल्हा आहे आणि त्याचे नाव देखील सपा सरकारने बदलले आहे,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

“तसेच यूपीतील अनेक संस्थांची आणि योजनांची नावे बहुतांशी जातीय द्वेषामुळे बदलण्यात आली आहेत. अशा स्थितीत, या पक्षाने आपल्या मतांसाठी कितीही नाटक केले तरी दलित आणि मागासवर्गीय सपाकडून आदर आणि सुरक्षिततेची अपेक्षा कशी करू शकतात?,” असा सवाल त्यांनी केला.