लखीमपूर खेरी (उ.प्रदेश) :उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात दोन दलित अल्पवयीन बहिणींची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. या घटनेनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

बुधवारी १५ आणि १७ वर्षांच्या या बहिणींचे मृतदेह गावातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. बलात्कार केल्यानंतर गळा आवळून दोघींची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी छोटू, जुनेद, सोहेल, हफिजुल रहेमान, करीमुद्दीन आणि आरीफ या सहा जणांना अटक केली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत जुनेद जखमी झाला. त्याच्याकडून एक मोटरसायकल, गावठी कट्टा आणि काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे लखीमपूरचे पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी सांगितले.

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

सर्व आरोपींना फाशी, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि भरपाईची पीडित बहिणींच्या कुटुंबीयांची मागणी आहे.

आणखी एक बलात्कार

उत्तर प्रदेशच्याच बलिया जिल्ह्यात १३ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्काराची आणखी एक घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी तुफानी यादव (२२) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित आणि आरोपी एकाच गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

योगी सरकारवर विरोधकांची टीका

विरोधी पक्षांनी राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला. बिल्किस बानो प्रकरणाचा धागा पकडत ‘बलात्कारातील आरोपींना सोडून त्यांचे स्वागत करणाऱ्यांकडून महिला सुरक्षेची अपेक्षा करता येत नाही,’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. ‘कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा याबाबत सरकारने केलेले दावे फोल ठरले आहेत,’ असे बसपा नेत्या मायवतींनी म्हटले. तर ‘सरकारचे पीडित कुटुंबाला संपूर्ण सहकार्य असेल आणि आरोपींविरोधात सक्त कारवाई केली जाईल,’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी दिले. 

लखीमपूरमधील दोन बहिणींच्या हत्येची घटना हृदयद्रावक आहे. वर्तमानपत्र आणि वाहिन्यांवर खोटय़ा जाहिराती देऊन कायदा-सुव्यवस्था सुधारणार नाही. उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचारांमुळे वाढ का झाली आहे?

प्रियंका गांधी-वाड्रा, काँग्रेस महासचिव

काय घडले? जुनेद आणि सोहेल यांचे दोन्ही बहिणींशी प्रेमसंबंध होते. दोघींनी लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्यांनी दोघींचा काटा काढायचे ठरवले. साथीदारांच्या मदतीने त्यांनी दोघींनी घरातून फरफटत नेले. यावेळी मुलीच्या आईलाही मारहाण करण्यात आली. शेतात नेऊन दोघींवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर दोघींची हत्या करून मृतदेह झाडाला टांगून ठेवले.