scorecardresearch

Premium

भारतात घातपात करण्यासाठी दाऊद इब्राहिमने तयार केली आहे विशेष टीम, दाऊदच्या टार्गेटवर आहेत…

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिम विरोधात एफआयआर दाखल केला आहे, त्यावरुन दाऊद भारतात घातपात करण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट झालं आहे

भारतात घातपात करण्यासाठी दाऊद इब्राहिमने तयार केली आहे विशेष टीम, दाऊदच्या टार्गेटवर आहेत…

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम पुन्हा सक्रिय झाला असून भारतात अतिरेकी कारवाया करण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( NIA) दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) विरोधात एक एफआयआर दाखल केला आहे. या माध्यमातून ही माहिती समोर आली असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) हा भारतात घातपात (terrorist attack) घडवण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्याने एक विशेष टीम तयार केली आहे. ही टीम भारतातील महत्त्वाचे राजकीय नेते, प्रमुख उद्योजक यांना लक्ष्य करणार असल्याचं एफआयआरमधुन उघड झालं आहे. एवढंच नाही तर स्फोटकं आणि घातक शस्त्रास्त्रे यांच्या सहाय्याने देशामध्ये विविध भागामध्ये हिंसाचार घडवण्याची योजना दाऊद इब्राहिमने आखली असल्याची माहिती आहे. यामध्ये दिल्ली आणि मुंबई या शहरांना लक्ष्य केलं जाणार असल्याची माहिती उघड झाल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

iron-dome-israel
इस्रायलचे रॉकेट हल्ल्यापासून संरक्षण करणारी आयर्न डोम यंत्रणा काय आहे?
delhi police
‘न्यूजक्लिककडून भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का लावण्याचा कट’; दिल्ली पोलिसांचा ‘एफआयआर’मध्ये आरोप
complaint against unknown person demanding money misusing former mayor NMMC, Sagar Naik
माजी महापौर सागर नाईक यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे उकळण्याचे प्रकार; पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल
sudhir mungantiwar
वाघनख महाराष्ट्रात आणणार, मात्र विरोधक खोडा टाकण्याचे काम करत आहे – सुधीर मुनगंटीवार

दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला मनी लाँडरिंगच्या चौकशीच्या संदर्भात शुक्रवारी अटक केली. कारागृहात असलेल्या कासकरवर नुकताच मनी लाँडरिंग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे ही घडामोड घडत असतांना दाऊद इब्राहिमबद्दलची ही खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dawood ibrahim has formed a special team to carry out strike in india dawood targets are asj

First published on: 19-02-2022 at 11:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×