दादरी येथे घटना ताजी असतानाचं आग्रापासून १०० किमी अंतरावर असलेल्या मैनपुरी येथे गाईची हत्या केल्याच्या आरोपावरून दोघांना हिंसक जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मैनपुरी जिल्ह्यातील करहल नगरिया भागात शुक्रवारी ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही तरुणांची जमावाच्या तावडीतून सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे.
सदर भागात गोहत्या झाली असल्याची बातमी कळताचं मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता. गावकऱ्यांनी आणि जमलेल्या जमावाने मोठ्या प्रमाणात गोंधळ केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या जमावाने पोलिसांच्या अनेक गाड्या जाळल्या. तर परिसरातील दुकानांनाही आग लावली. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीसांच्या तपासात गाईची हत्या झाली नसल्याचे उघड झाले आहे. पोलीसांनी ५०० अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच २० जणांना अटक करण्यात आली आहे. गाईच्या मालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाची मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बारकाईने चौकशी केली असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात आदेश दिले आहेत. तसेच येथील परस्थितीवर ते बारकाईने नजर ठेऊन आहेत.

Exit Polls 2023 Result: कोण जिंकणार लोकसभेची सेमीफायनल? काय आहेत एग्झिट पोलचे अंदाज?