‘सीआयएसएफ’च्या जवानाचा करोनाने मृत्यू

या दलात आतापर्यंत करोनाने मरण पावलेल्यांची संख्या सहा झाली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाचा रविवारी करोनाने मृत्यू झाला. या दलात आतापर्यंत करोनाने मरण पावलेल्यांची संख्या सहा झाली आहे.

केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये आतापर्यंत करोनामुळे १८ जणांचे मृत्यू झाले असून त्यात केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो-तिबेटन सीमा पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) व सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की राम मनोहर लोहिया रुग्णालयात कॉन्स्टेबल जितेंदर कुमार याचा मृत्यू झाला. त्याला ताप व श्वासातील अडचणींमुळे १० जूनला रुग्णालयात दाखल केले होते. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेच्या कामासाठी तैनात केलेल्या जवानांत त्याचा समावेश होता. तो मूळ उत्तर प्रदेशातील बागपतचा असून जयपूरमधील आठव्या बटालियनमध्ये होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Death of a cisf soldier by corona abn