scorecardresearch

Premium

मणिपूरमधील बेपत्ता विद्यार्थ्यांचा मृत्यू; सरकारचे संयम राखण्याचे आवाहन

मणिपूरमध्ये जुलै महिन्यापासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे सोमवारी समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

manipur riots
मणिपूरमधील बेपत्ता विद्यार्थ्यांचा मृत्यू

पीटीआय, इम्फाळ : मणिपूरमध्ये जुलै महिन्यापासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे सोमवारी समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. बेपत्ता विद्यार्थ्यांची दोन छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली. एका छायाचित्रात त्यांच्याबरोबर दोन सशस्त्र व्यक्ती दिसत आहेत, तर अन्य एका छायाचित्रात त्यांचे मृतदेह आहेत. त्यानंतर काही तासांमध्येच राज्य सरकारने लोकांना संयम राखण्याचे आणि अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचे अपहरण आणि हत्येचा तपास करू देण्याचे आवाहन केले. तसेच कोणताही अनुचित प्रसंग उद्भवू नये यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सोमवारी रात्री यासंबंधी निवेदन प्रसृत केले. या प्रकरणाचा तपास आधीच सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे त्यामध्ये सांगण्यात आले आहे. फिजम हेमजित (२०) आणि हिजाम लिन्थोइनगाम्बी (१७) अशी या मृत विद्यार्थाची नावे असून ते ६ जुलैपासून बेपत्ता होते. त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

auction onion
लिलाव बंदचा कांद्याच्या दरांवर काय परिणाम? व्यापाऱ्यांच्या माघारीनंतर चित्र कसे बदलणार?
chagan bhujbal baban gholap
“…तेव्हा शिवसेना सोडण्याची इच्छा बाळगणाऱ्यांमध्ये बबन घोलप आघाडीवर”, छगन भुजबळ यांचा टोला
class 11 admission date extended in pune and pimpri chinchwad, class 10 atkt can apply to class 11
अकरावीत प्रवेशापासून वंचित असलेले आणि दहावीमध्ये ‘एटीकेटी’ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता शेवटची संधी…
unemployment
कंत्राटी भरतीविरोधात संतापाची लाट; राज्यभरातील विद्यार्थ्यांची आंदोलनाची तयारी

प्रियंका गांधींची केंद्र सरकारवर टीका

केंद्र सरकारला आपल्या निष्क्रियतेची शरम वाटायला पाहिजे, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली. मणिपूरमध्ये भयंकर गुन्हे घडू दिले जात आहेत आणि केंद्र सरकार मात्र निष्क्रिय आहे, अशी टीका त्यांनी एक्स या समाजमाध्यमाद्वारे केली. वांशिक हिंसेमध्ये मुले सर्वाधिक असुरक्षित असतात, त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांनी लिहिले आहे.

पोलिसांचा लाठीमार

बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ मंगळवारी इम्फाळ खोऱ्यात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. त्यामध्ये ३०पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले. जखमींमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी लाठीमार केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Death of missing students in manipur government calls for restraint ysh

First published on: 27-09-2023 at 00:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×