बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात ‘अॅक्यूट एन्सेफलाइटिस सिंड्रोम’ (एईएस) या आजाराने मृत्यू झालेल्या बालकांची संख्या आता १०० वर पोहचला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अद्याप पर्यंत पिडीत रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची भेट न घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन व वैद्यकीय अधिका-याना शक्य तितक्या सर्व उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय मुख्यमंत्रा नितीश कुमार यांनी या आजारामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबीयास चार लाख रूपये दिले जाणार असल्याचेही सांगितले आहे. शासकीय श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (एसकेएमसीएच) तसेच एका खासगी संस्थद्वारे चालवले जाणारे केजरीवाल रूग्णालयात मिळून १०० बालकांचा मृत्यू झाला आहे. ही मुल ‘अॅक्यूट एन्सेफलाइटिस सिंड्रोम’ (एईएस) या आजाराने त्रस्त होती अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अधिका-यांचे मत आहे की बहुतांश मुल ही हाइपोग्लाइसेमियाने त्रस्त होती. हाइपोग्लाइसेमियामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण मोठ्याप्रमाणात खालवते. मृत्यू झालेल्या बहुतांश मुलांचे वय हे दहा वर्षांच्या आतीलच होते. १ जून नंतर एसकेएमसीएच रूग्णालयात १९७ मुलांना तर केजरीवाल रूग्णालयात ९१ मुलांना दाखल करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी मुजफ्फरपुरमधील श्रीकृष्ण रूग्णालयास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, मी भागातील लोकांना विशेषकरून पडित रूग्णांच्या कुटूंबीयांना हमी देतो की या समस्यवर लवकरात लवकर कायमचा उपाय शोधण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला शक्य ती सर्व आर्थिक व तांत्रिक मदत करेल. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्यमंत्री रूग्णालयात असतानाच त्याठिकाणी दोन मुलांचा मृत्यू झाला.