Premium

“मरण जवळ आलं होतं, शेजारीच…”, दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या महिलेची थरारक कहाणी

“तेवढ्यातच दहशतवाद्यांनी एका व्हॅनमधून भरपूर शस्त्रे घेतली. या परिसरात ते जवळपास तीन तास होते. तेवढ्यात वरून घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर मला दिसले, अशी माहिती तिने दिली.

Gili Yoskovich
इस्रायल आणि पॅलेस्टाइन युद्धात अडकलेल्या महिलेने सांगितली आपबिती (फोटो – बीबीसी)

इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात शेकडो नागरिकांचे प्राण गेले आहेत. हजारो नागरिक जखमी झाले आहेत. तिथं सुरू असलेल्या हिंसाचारात अनेक नागरिक अडकले असून त्यांच्या अनेक कहाण्या आता समोर येऊ लागल्या आहेत. गाझा पट्टीवरील दक्षिण इस्रायलमधील नृत्य संगीत महोत्सवात सामील झालेली गिली योस्कोविच हीसुद्धा या संघर्षात अडकली होती. तिने तिचा जीव कसा वाचवला, याबाबतची धक्कादायक कहाणी बीबीसीसह शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गिली योस्कोविच म्हणाली की, “मी झाडाखाली लपले होते. कारण बंदुकधारी हल्लेखोर मिळेल त्याला गोळ्या झाडत होते. गोळीबार सुरू असलेल्या कारच्या शेजारीच मी उभे होते. ते मला सहज मारू शकत होते. तिथं अनेकजण आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते.”

हेही वाचा >> “माझी मुलगी सुरक्षित, ती भारतात…”; इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचाच्या आईची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

पोमेलोच्या झाडांचा घेतला आधार

“दहशतवादी चारही दिशांहून येत होते. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी कुठे जायचं हे कळत नव्हतं. त्यामुळे मी माझ्या गाडीत बसले आणि गाडी पुढे नेली. यावेळी काहीजण माझ्यावर गोळीबार करत होते. त्यामुळे मी कार सोडली आणि पळू लागले. तिथं मला काही पोमेलोची झाडे दिसली. तिथं मी लपले”, अशी आपबिती तिने सांगितली.

जमिनीवर पडून राहिले

“दहशतवाद्यांपासून लपण्याकरता मला एकमेव जागा होती ती जमीन. मी शेताच्या मधोमध जमिनीवर पडून राहिले. परंतु, ते झाडा-झाडांतून जात होते आणि गोळीबार करत होते. त्यांचा सर्वत्र गोळीबार सुरू होता. आजूबाजूला मृतांचा खच पडला होता. तरीही मी शांत राहिले. मी रडलेही नाही”, अशीही हिकायत तिने सांगितली.

मरण जवळ आलं होतं

“यादरम्यान, मला सतत वाटत होतं की माझं मरण जवळ आलंय. पण मी स्वतःला समजावत होते. ठीक आहे, मी मरणार आहे. त्यामुळे मी फक्त डोळे बंद करून दिर्घ श्वास घेत होते. माझ्या अगदीच जवळ सर्वत्र गोळीबार सुरू होता”, असंही तिने सांगितलं.

हेही वाचा >> Israel War: इस्रायलमध्ये परिस्थिती गंभीर! हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; Video व्हायरल

दहशतवाद्यांच्या तोंडी होती अरबी भाषा

“तेवढ्यातच दहशतवाद्यांनी एका व्हॅनमधून भरपूर शस्त्रे घेतली. या परिसरात ते जवळपास तीन तास होते. तेवढ्यात वरून घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर मला दिसले. सुरुवातीला मला वाटलं की लष्कराने मदतीसाठी हे हेलिकॉप्टर पाठवले आहे, त्यामुळे ते हेलिकॉप्टर खाली उतरून मला मदत करतील असं वाटलेलं. परंतु, ते हेलिकॉप्टरही दहशतवाद्यांचंच होतं. दरम्यान, दहशतवादी हळूहळू माझ्याजवळ येत गेले. त्यामुळे माझा थरकाप उडत होता. मी माझा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल. त्यांच्या तोंडून अरबी भाषा ऐकू येत होती”, अशीही माहिती सांगितली.

लष्करी जवान दिसल्याने सोडला सुटकेचा निश्वास

“या काळात मी फक्त माझ्या मुलांबद्दल, माझ्या मित्रांबद्दल विचार करत होते. त्यांच्या विचाराने माझ्या मनातून मरणाचा विचार दूर झाला. मग मला एका बाजूने काही हिब्रू भाषा ऐकू येऊ लागली. त्यानंतर, लक्षात आले की तेथे काही लष्करी जवान आहेत”, असं ती म्हणाली.

हेही वाचा >> ‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यामागचे कारण काय? आखातात मोठ्या युद्धाचा भडका उडणार?

“मी या लष्करी जवानांकडे जायचे ठरवले. दरम्यान अजूनही आजूबाजूला दहशतवादी होते, त्यामुळे मी हात वर करून जात होते जेणेकरून जवांनांना कळेल की मी दहशतवादी नाही. मग कोणीतरी मला गाडीत बसवले. मैदानातून बाहेर पडणारी मी पहिली होते. इतरांना बाहेर पडण्यासाठी आणखी दोन-तीन तास लागले”, असंही तिने सांगितलं. लष्कराने तिची सुटका केल्यामुळे तिचा जीव वाचला. दरम्यान, यासाठी तिला असंख्य प्रयत्न करावे लागले. दैव बलवत्तर म्हणूनच ती सुखरुप त्या दृष्टचक्रातून बाहेर पडली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Death was near nearbya thrilling story of a woman who escaped from the isreal and pallestine war of terrorists sgk

First published on: 08-10-2023 at 15:01 IST
Next Story
“हमास दहशतवाद्यांकडून बलात्काराचा शस्त्रासारखा वापर”, अनेक महिला बेपत्ता झाल्यानंतर ‘इस्रायल वॉर रुम’कडून भीती व्यक्त