देशातील शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती आणि समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच २४ तास चालणारी विशेष वाहिनी सुरू करण्यात येणार आहे. या वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाची स्थिती आणि बियाणांबद्दल माहिती देण्यात येईल. यासंदर्भात सरकार आणि प्रसार भारतीची योजना अंतिम टप्प्यात असून, ‘डीडी किसान’ ही शेती विषयाला वाहिलेली वाहिनी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.