पंजाबमधील वीजपुरवठय़ाची स्थिती अधिक नाजूक होण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्त्वाच्या वीजनिर्मिती केंद्रावरील कोळशाचा साठा कमालीचा घटला असून त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर होण्याची भीती आहे. वीज प्रकल्पांना लागणारा कोळशाचा साठा दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच असल्याचे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात केंद्राशी बोलणी झाली असली तरी पंजाब राज्य वीज मंडळाच्या तीन वीज प्रकल्पातील कोळशाचा साठा कमालीचा घटला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक भागांत विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.राज्यातील तीन वीज प्रकल्पांमध्ये सध्या कोळशाचा मोठा तुटवडा भासत आहे.