शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर बंडखोरांनी आनंद साजरा केल्याच्या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा यासाठी आमचा बंड नव्हता. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर आम्ही कुणीही आनंद साजरा केला नाही. आम्ही आजही शिवसेनेत आहोत,” असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. ते गोव्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

दीपक केसरकर म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही आनंद साजरा केल्याचं बोललं जातंय, मात्र इथं शिवसेना आमदारांमध्ये कुणीही आनंद साजरा केला नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आमचा बंड नव्हता. आमचा बंड आघाडीविरोधात होता. उद्धव ठाकरेंचं मन दुखावं हा हेतू नव्हता. आम्ही आजही शिवसेनेत आहोत. शिवसेनेत ठाकरे कुटुंबाला कोणाचाही विरोध नाही.”

sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

“एकनाथ शिंदे मुंबईला मंत्रीपदाच्या वाटपात खूप मोठा वाटा घ्यायला गेले नाही”

“एकनाथ शिंदे मुंबईला मंत्रीपदाच्या वाटपात खूप मोठा वाटा घ्यायला गेले असं नाही. ते महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी काय करता येईल त्यावर चर्चा करण्यासाठी गेले आहेत. दोन्ही पक्ष मिळून जो निर्णय घेतील त्यात आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असू,” अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

दीपक केसरकर म्हणाले, “भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांशी बोलून निर्णय घेतील. अद्याप कोणत्याही मंत्र्याची नावं ठरलेली नाही. येथे असलेल्या आमदारांमध्ये चलबिचल करण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत.”

पाहा व्हिडीओ –

“एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचे मानसपूत्र आहेत आणि त्यांच्याप्रमाणे ते एकवचनी आहेत. त्यांनी एका मोठ्या पक्षाला शब्द दिला होता. त्यामुळे आम्ही हा शब्द फिरवणं शक्य नव्हतं,” असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं.

“संजय राऊत स्वतः शिवसेनेत, मात्र निम्म काम राष्ट्रवादीचं करतात”

दीपक केसरकर म्हणाले, “आता जी युती होत आहे ती महाराष्ट्राच्या जनेतेने निवडून दिलं त्यांची होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करू नये. पाठीत कुणी खंजीर खुपसला असेल तर तो संजय राऊत यांच्यासारख्या लोकांनी खुपसला. त्यांनी चुकीचा सल्ला दिला. संजय राऊत स्वतः शिवसेनेत आहेत, मात्र निम्म काम राष्ट्रवादीचं करत असतात. त्यावेळी ते जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असतात.”

“संजय राऊत केंद्र व राज्यात वाद लावून देत आहेत”

यावेळी दीपक केसरकर शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर सडूकन टीका केली. ते म्हणाले, “आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे आहे की संजय राऊत यांनी सकाळी ९ वाजता उठून एक पत्रकार परिषद घ्यायची. केंद्रावर टीका करायची आणि केंद्र व राज्यात वाद लावून द्यायचा असं सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर केंद्र व राज्य यात चांगले संबंध असावे लागतील. हीच आमची भूमिका आहे.”

उद्धव ठाकरेंसोबतच्या १६ आमदारांची आमदारकी रद्द होणार का? दीपक केसरकर म्हणाले…

दीपक केसरकर म्हणाले, “मला विचारण्यात आलं की उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या १६ आमदारांचं काय होईल? त्यावर मी सांगितलं आहे की ज्यावेळी बहुसंख्य आमदार आपला नेता निवडतात त्या नेत्यासोबत त्यांना रहावं लागतं. आम्ही विधीमंडळात आमचा पक्षाची नोंदणी केली तेव्हा आम्ही आमच्या आमदारांच्या स्वाक्षरी दिल्या आहेत. त्यामुळे १६ आमदार आपला निर्णय बदलू शकत नाही. बहुसंख्यांकांनी निवडलेल्या नेत्याचा व्हिप त्या १६ आमदारांना देखील बंधनकारक राहील. आम्ही त्यांना आमच्यासोबत चला असा म्हणणार नाही.”

पक्षाची घटना बंधनकारक ही जनतेची दिशाभूल : दीपक केसरकर

“पक्षांतर बंदी कायदा विधीमंडळात काय कृती करता यावर लागू होतो. व्हिपने हजर राहण्यास सांगितलं, मतदान करायला सांगितलं तर तसं करावं लागतं. कायद्यात ‘ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस’ असं स्पष्ट म्हटलं आहे. पक्षाची घटना बंधनकारक आहे अशी जनतेची दिशाभूल केली जात आहे. देशाची घटनाच अंतिम आहे असे न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. त्याला डावलून इतर कोणतीही घटना काम करू शकत नाही,” असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंना आम्ही अनेक वेळा सुचवलं होतं, पण…”; दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप

“कायद्यात काही तरतूद असेल तर त्याला पक्षाची घटना डावलू शकत नाही. कारण पक्षाची घटना पक्ष ठरवतो. विधीमंडळात आपली लिखित घटना चालते. त्यापलिकडे कुणी जाऊ शकत नाही,” असंही दीपक केसरकर यांनी नमूद केलं.