‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांसोबत जाण्याचा दीपिकाला अधिकार; स्मृती इराणींचा खोचक टोला

यापूर्वी भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी दीपिका ‘टुकडे टुकडे गँग’सोबत गेली असल्याचे वादग्रस्त विधान केले होते.

दीपिका पदुकोण, स्मृती इराणी

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ल्याच्या घटनेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हीने पाठिंबा दर्शवला आहे. यावरुन तिला अनेकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी तर ती ‘टुकडे टुकडे गँग’सोबत गेली असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील दीपिकावर शरसंधान साधले आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांसोबत जाण्याचा दीपिकाला अधिकार आहे, अशा शब्दांत इराणी यांनी खोचक टोला लगावला आहे. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

एका प्रश्नाला उत्तर देताना इराणी म्हणाल्या, “मला जाणून घ्यायचं आहे की अखेर दीपिका राजकीयदृष्ट्या कोणाशी जोडली गेली आहे. ज्याने ही बातमी वाचली असेल त्या प्रत्येकाला हे जाणून घ्यायला आवडेल की दीपिका आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये काय करीत होती. जे लोक भारताचे तुकडे करु इच्छितात तसेच ज्या लोकांनी काठ्यांनी मुलींच्या गुप्तांगांवर प्रहार केला, अशा लोकांसोबत दीपिका उभी राहिली याचं मला आश्चर्य वाटलेलं नाही. भाजपा नेते तेजिंदर पाल बग्गा यांनी स्मृती इराणींच्या या टिपण्णीचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

आणखी वाचा – #JNUViolence: “जे काही सुरु आहे ते संतापजनक,” दीपिकाची पहिली प्रतिक्रिया

दीपिका काँग्रेसची समर्थक

दीपिका पदुकोणवर काँग्रेसशी संबंध असल्याचे सांगताना स्मृती इराणी म्हणाल्या, दीपिकाने सन २०११ मध्ये आपला काँग्रेसला पाठिंबा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ज्या लोकांना तिने जेएनयूत गेल्याबद्दल आश्चर्य वाटत आहे, त्यांना ही गोष्ट माहिती नाही.

जेएनयू हल्ल्यावर आत्ताच काही बोलणार नाही – इराणी

त्याचबरोबर जेएनयूमध्ये बुरखाधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर स्मृती इराणी म्हणाल्या, “या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. तसेच मी सध्या संविधानिकपदावर कार्यरत आहे. त्यामुळे पोलिसांकडून तपासाचे पुरावे कोर्टात सादर केल्यानंतरच मी त्यावर काही बोलणे योग्य ठरेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Deepika padukone has the right to stand with people who say bharat tere tukde honge says smriti irani aau

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या