संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत प्रवास करत असलेलं एमआय-१७ व्ही५ हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तसंच इतर १४ वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान बिपिन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. या अपघातानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या अपघाताबद्दलची सविस्तर माहिती राजनाथ सिंह यांनी कुटुंबियांना दिल्याचं सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. त्यासंदर्भातील बातमी दुपारी एकच्या समोर आली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्येच पंतप्रधान मोदींना या अपघाताबद्दलची माहिती दिली. राजनाथ सिंह हे या अपघातासंदर्भात संसदेमध्ये सविस्तर माहिती देणार असल्याचं समजतं. मात्र संसदेमध्ये जाण्याआधी राजनाथ सिंह दिल्लीमध्ये रावत यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यांनी दहा मिनिटं रावत यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. त्यानंतर ते तेथून संसदेमध्ये गेले.

हवाई दलाने बिपिन रावत या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचं हवाई दलाने सांगितलं आहे. बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या असं सांगितलं जात आहे. दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defence minister rajnath singh reaches cds bipin rawat residence scsg
First published on: 08-12-2021 at 16:23 IST