दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने अरविंद केजरीवाल यांनी घेतलेल्या प्रचारसभांमधून सत्ताधारी भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे. त्यापाठोपाठ आता दिल्लीमधे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून अरविंद केजरीवाल सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. हीच प्रतिष्ठा जपण्यासाठी केजरीवाल या निवडणुकीत दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले असून आपचा जोरदार प्रचार करत आहेत. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या अशाच एका रॅलीमध्ये प्रत्यक्ष आपचे नेते आणि काही आमदारांचेच मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

२० मोबाईल चोरीला गेल्याची घटना!

बुधवारी आपकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीच्या माल्क गंज भागातून ही रॅली जात असताना या रॅलीत तब्बल २० मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये आपचे काही आमदार आणि नेतेमंडळींचाही समावेश आहे. दिल्ली नॉर्थचे डीसीपी सागर कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपच्या रॅलीदरम्यानच ही चोरी झाली असून त्यासंदर्भात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप

आमदारांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

आम आदमी पक्षाचे आमदार अखिलेश त्रिपाठी, आपच्या नेत्या गुड्डी देवी आणि आमदार सोमनाथ भारती यांच्या सचिवांनी या मोबाईल चोरीविषयी तक्रार दाखल केली असून त्या आधारावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातला तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दिल्लीच्या २५० महापालिका जागांसाठी येत्या ४ डिसेंबर रोजी मतदान होत असून ७ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.