scorecardresearch

Delhi Accident : दिल्लीत पुन्हा भयानक अपघात; ३५० मीटर फरपटत नेल्यानंतर कारच्या बोनेटवर अडकलेल्या व्यक्तीचा मृत्यू!

दारूच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्यासह पाच जणांना अटक

Accident new
(प्रातिनिधिक छायाचित्र)

दिल्लीतील थरकाप उडवणाऱ्या अपघातांच्या घटनेचे सत्र सुरू आहे. कंझावाला येथील भयानक घटनेनंतर आता तशाचप्रकारे केशवपुरम भागातही एक घटना घडल्याचे समोर आले आहे. दारूच्या नशेत असणाऱ्या भरधाव कारचालकाने एका दुचाकीस्वारास जोरदार धडकली, यामुळे घडलेला अपघात एवढा भीषण होता की कारची धडक बसताच दुचाकीस्वार आणि त्याचा सहकारी दोघेही हवेत उडाले. त्यापैकी एक जण कारच्या छतावर आदळून रस्त्यावर पडला, तर दुसरा बोनेटवरच अडकला आणि त्यांची दुचाकी(स्कुटी) ही कारमध्ये फसली होती. एवढं होऊनही भरधाव वेगातील कार मात्र थांबली नाही, ती त्या दोघांना जळपास साडेतीनशे मीटर फरपटत नेले. यापैकी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.

या भयानक घटनेची माहिती मिळताच त्या भागात गस्तीवर असणाऱ्या केशवपुरम पोलिसांनी आणि पीसीआर व्हॅन पोलिसांनी कार चालकासह पाच जणांना अटक केली. अपघातीतील गंभीर जखमींनी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अपघातमधील मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे.

हेही वाचा – Gujarat Accident : दिल्लीप्रमाणेच गुजरातमध्येही थरकाप उडवणारी दुर्घटना; भरधाव कारने दुचाकीस्वारास १२ किलोमीटर फरपटत नेलं!

अपघातमध्ये मृत्यू झालेल्याचे नाव कैलाश भटनागर आणि गंभीर जखमी असलेल्याचे सुमीत खारी असल्याचे समोर आले आहे. तर, चौकशी असे समोर आले आहे की या घटनेतील सर्व आरोपी हे विद्यार्थी असून ते एका विवाहसमारंभातून घरी निघाले होते आणि नशेमध्ये होते.

कंझावाला अपघात –

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील कंझावाला येथे अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला कार चालकाने १२ किलोमीटर फरपटत नेलं होतं. या अपघातात अंजलीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 09:54 IST

संबंधित बातम्या