जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. तर, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. द इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने हे सर्वेक्षण केलं होतं. जगभरातल्या ६० शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. सुरक्षित शहरं निवडण्यासाठी ७६ निकषांची पुर्तता करण्याची अट होती. यामध्ये डिजीटल, हेल्थ, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि संबंधित शहरात माणूस वैयक्तिकरित्या किती सुरक्षित आहे, या सर्व गोष्टींचा समावेश होता.

भारताची राजधानी दिल्लीसह मुंबईचे या यादीत नाव आहे. यामध्ये दिल्ली ६० पैकी ४८व्या क्रमांकावर तर मुंबई ५०व्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि मुंबईच्या मध्ये जोहान्सबर्ग आणि रियाध ही दोन शहरं आहेत. मुंबई दिल्लीपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं तरीही वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत दिल्ली ५२.८ पॉइंट्ससह ४१व्या क्रमांकावर आहे. तर मुंबई ४८.२ पॉइंट्ससह ५०व्या क्रमांकावर आहे.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Pune city leads the country in house sales Pune news
घरांच्या विक्रीत देशात पुण्याची आघाडी! जाणून घ्या शहरातील कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती…
Single airline monopoly Nagpur
नागपूर-मुंबईदरम्यान एकाच विमान कंपनीची मक्तेदारी; प्रवासी त्रस्त, कंपनी…
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका

डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन १०० पैकी ८२.४ पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. कोपेनहेगनने टोक्यो आणि सिंगापूरसारख्या शहरांना मागे टाकत सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर कॅनडाची राजधानी टोरंटो आहे. टोरंटोला ८२.२ पॉइंट्स मिळाले आहेत. टोरंटो हे वैविध्यपूर्ण शहर असून इथली जवळपास ३० लाख लोक १८० भाषा बोलतात. उन्हाळा आवडणाऱ्यांसाठी तर टोरंटो नंदनवन आहे. तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर शहर आहे. शहराची दुसऱ्या क्रमांवरून तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. करोनाचा सिंगापूर शहराला मोठा फटका बसला असला तरी हे शहर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलंय. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी आहे. सिडनीला ८०.१ पॉइंट्स मिळाले आहेत. सिडनी हे जगातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक असून खाद्यप्रेमींसाठी पर्वणी आहे. तर पाचव्या क्रमांकावर जपानची राजधानी टोक्यो शहर आहे.