महिलेला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी मंगळवारी अटक झाल्यानंतर तथाकथित भाजपा कार्यकर्ता श्रीकांत त्यागीचे सूर आता बदलले आहेत. ज्या महिलेशी त्यागीने गैरवर्तन केले होते ती महिला आपल्याला बहिणीसारखी असल्याचे त्याने माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. न्यायालयाने त्यागीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही संपूर्ण घटना राजकीय असून कोणीतरी आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यागीने माध्यमांशी बोलताना केला. या घटनेविषयी त्याने यावेळी माफी देखील मागितली.

काही दिवसांपूर्वी महिलेला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करतानाचा त्यागीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर बराच व्हायरल झाला होता. याप्रकरणी नोएडा पोलिसांनी त्याच्याविरोधात कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केल्यानंतर तो फरार होता. अखेर नोएडा पोलिसांनी त्याला मंगळवारी उत्तर प्रदेशातील मेरठमधून अटक केली. त्यागीच्या तीन साथीदारांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. समाजमाध्यमांवर स्वत:ला भाजपा किसान मोर्च्याचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणवणारा त्यागी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

नोएडाच्या ‘ग्रँड ओमाक्सी’ सोसायटीमधील त्यागीच्या घराबाहेरचे अनधिकृत बांधकाम सोमवारी प्रशासनाकडून पाडण्यात आले होते. या कारवाईचे सोसायटीतील रहिवाशांकडून स्वागत करण्यात आले होते. त्यागीने केलेले अतिक्रमण आणि त्याच्या वागणुकीचा त्रास होत असल्याचा आरोपही रहिवाशांकडून करण्यात आला होता.

स्वत:ला भाजपा कार्यकर्ता म्हणवणारा त्यागी आपल्या चारचाकी गाडीवर ‘व्हिव्हिआयपी’ स्टिकर मिरवत होता. हे स्टिकर त्याला समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मोर्या यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय राज्य सरकारचे अधिकृत चिन्ह लोकांमध्ये धाक निर्माण करण्यासाठी तो वापरत असल्याचे नोएडाचे पोलीस आयुक्त आलोक सिंह यांनी सांगितले आहे. दरम्यान, ‘ग्रँड ओमाक्सी’ सोसायटीमध्ये प्रवेश करुन त्यागीने शिवीगाळ केलेल्या महिलेविषयी विचारणा करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

वृक्षारोपण करताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगणाऱ्या महिलेशी त्यागीचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या घटनेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये त्यागी त्या महिलेला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करताना दिसत होता. या घटनेची गंभीर दखल घेत त्यागीविरोधात सरकारकडून कारवाई करण्यात आली.