scorecardresearch

Arvind Kejriwal Death Threat : अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

ARVIND KEJRIWAL
अरविंद केजरीवाल (संग्रहित फोटो)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीचा शोध लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांना सोमवारी (३० जानेवारी) रात्री उशिरा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोन कॉलद्वारे ही धमकी देण्यात आली. धमकीच्या या कॉलनंतर दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले होते. तपास केल्यानंतर धमकी देणारा आरोपी मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >>> “एकेकाळी इतर देशांवर अवलंबून असलेला आपला भारत देश आज…” राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कौतुक

अरविंद केजरीवाल यांना धमकी देणारा आरोपी ३८ वर्षीय असून तो मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर दिल्लीमधील गुलाबी बाग येथे उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 12:27 IST