Delhi : दिल्लीमधील शाहदरा जिल्ह्यातील गांधी नगरमध्ये एका २० वर्षीय मुलाची त्याच्या मित्रांनीच गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच हा गुन्हा करणाऱ्यांना आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याची माहितीही दिल्ली पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

दिल्लीमधील शाहदरा या परिसरात शनिवारी मित्रा मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झालं. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांनी एका १९ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना शनिवारी घडली. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, सुफियान आणि आरोपी यांच्यात टोपीवरून वाद झाला. सुफियान याने दोन अल्पवयीन मुलांना चापट मारली. मात्र, त्यानंतर त्या दोघांनी त्याच्या हत्येचा कट रचला, अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Kanpur Crime News
Kanpur : धक्कादायक! महिलेची हत्या करून मृतदेह ‘व्हिआयपी’ परिसरात पुरला; चार महिन्यांनी ‘असं’ उलगडलं घटनेचं रहस्य
nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा : Kanpur : धक्कादायक! महिलेची हत्या करून मृतदेह ‘व्हिआयपी’ परिसरात पुरला; चार महिन्यांनी ‘असं’ उलगडलं घटनेचं रहस्य

दरम्यान, या घटनेनंतर गांधी नगर पोलीस ठाण्यात गोळीबाराची तक्रार करण्यासाठी पोलिसांना एक फोन आला. त्यानंतर तातडीने पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली. या गोळीबाराच्या घटनेत सुफियान नावाच्या तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात दिल्ली आणि गाझियाबादमधील वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. तसेच पोलीस आणखी एका संशयिताचा आणि एका आरोपीच्या आईचाही शोध घेत आहेत. या तीन अल्पवयीन आरोपींपैकी एका आरोपीच्या आईने आपल्या अल्पवयीन मुलाला पिस्तूल पुरवल्याचा आरोप आहे. याचा शोध आता पोलीस घेत आहेत. याबरोबरच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली एक स्कूटर आणि त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

तीन दिवसांत तीन गोळीबाराच्या घटना

दिवाळीच्या दिवशी शाहदरा येथील एका ४० वर्षीय व्यक्तीची त्याच्या १७ वर्षीय दूरच्या नातेवाईकाने कर्ज न भरलेल्या जुन्या वैमनस्यातून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतलं होतं. यानंतर काल ऐन दिवाळीच्या उत्सव सुरु असतानाच शाहदरा परिसरात एका कुटुंबावर क्रूर हल्ला झाला. सशस्त्र गुन्हेगारांनी उघडपणे कुटुंबातील दोन सदस्यांची गोळ्या झाडून हत्या केली. दरम्यान, दिल्लीत अशा गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप करण्यात येत असून दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Story img Loader