Delhi-Dehradun Expressway Hate Speech Controversy: दिल्ली-देहरादून महामार्गावरील भिंतीवर आक्षेपार्ह घोषणा लिहिल्याचा प्रकार घडला असून याबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महामार्गालगत असलेल्या भिंतीवर मुस्लीम समाजाविरोधात द्वेषपूर्ण मजकूर लिहिण्यात आला आहे. यात लिहिले की, हा रस्ता मुस्लीमांसाठी नाही. या लिखाणाची जबाबदारी हिंदू रक्ष दलाशी निगडित लोकांनी घेतली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही महिला सदर घोषणा लिहित असल्याचे दिसत आहे. मात्र त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या कर्मचाऱ्याने याबद्दल तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तक्रारीनंतर हिंदू रक्षा दलाच्या अज्ञात सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील बिहारीगडजवळील दिल्ली-देहरादून महामार्गालगत असलेल्या उंच साऊंड बॅरियअर भिंतींवर हा मजकूर लिहिण्यात आला होता.
सहारनपूरचे पोलीस अधीक्षक सागर जैन म्हणाले, स्थानिक रहिवाशांनी शुक्रवारी सकाळी बिहारीगड पोलीस ठाण्यात संबंधित घोषणांबद्दल माहिती दिली होती. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी तात्काळ काळ्या रंगाने ही वाक्य झाकली. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हिंदू रक्षा दलाचा सदस्य या कृत्याची जबाबदारी घेत असल्याचे दिसत आहे.
Dead sure these dumbfucks don’t pay taxes…. those working hard to earn and pay taxes have no time for this bigotry!
— Nabila Jamal (@nabilajamal_) February 28, 2026
? Few women seen drawing graffiti along the Delhi–Dehradun Expressway (NH-72A) near Saharanpur reading “This road is not for Muslims”…. The mural claimed that… pic.twitter.com/8IZDi31Dq5
पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले, अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३ (२) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. पोलिसांचा तपास सुरू असून आम्ही लवकरच आरोपीला जेरबंद करू. एनएचएआयचे कर्मचारी सुनील कुमार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, स्प्रे पेंटचा वापर करून मुस्लीमांविरुद्ध लिहिलेल्या वादग्रस्त घोषणा लिहिल्या गेल्या.
