१६ डिसेंबर रोजी एका युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पीडित युवतीच्या मित्राने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच ध्वनिचित्रफीत (सीडी) पुरावा म्हणून वापरण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी दिली
आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींनी सदर ध्वनिचित्रफीत पुरावा म्हणून सादर करण्याची परवानगी मागितली होती, मात्र कनिष्ठ न्यायालयाने ‘सीडी’ हा पुरावा ठरू शकत नसल्याचे कारण पुढे करीत ही परवानगी नाकारली होती.
उच्च न्यायालयाने मात्र या आदेशास विरोध करीत, ४ जानेवारी प्रसारित करण्यात आलेल्या मुलाखतीची ध्वनिचित्रफीत पुरावा म्हणून वापरावी, अशी सूचना कनिष्ठ न्यायालयास न्यायमूर्ती जी. पी. मित्तल यांनी
दिली.५ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत सदर आदेश देण्यात आले.