सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदीची मागणी करणाऱ्याला कोर्टाने फटकारलं; सांगितलं “भावना दुखावत असतील तर….”

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदीची मागणी दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

Delhi High Court, Congress, Salman Khurshid, Salman Khurshid book
सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदीची मागणी दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन सुरु असलेला वाद अद्याप मिटलेला नाही. सलमान खुर्शीद यांनी आपलं पुस्तक ‘Sunrise Over Ayodhya’ मध्ये हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. दरम्यान अशीच मागणी करणारी एक याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली असून भावना दुखावत असतील तर लोक दुसरं काहीतरी चांगलं वाचू शकतात असं म्हटलं आहे.

पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी कधीही…!”

कोर्टाने याचिकाकर्त्याला सांगितलं आहे की, “तुम्हीच लोकांना हे पुस्तक खरेदी करु नका किंवा वाचू नका असं का सांगत नाही? हे पुस्तक चांगलं नसून ते वाचू नका असं प्रत्येकाला सांगा. जर भावना दुखावल्या जात असतील तर ते इतर काहीतरी चांगलं वाचू शकतात”. याचिकाकर्त्याने हे पुस्तक भावना दुखावणारं असून त्यावर बंदी आणावी अशी मागणी केली होती.

हिंदुत्वाची आयसिस, बोको हरामशी तुलना; सलमान खुर्शिदांच्या नव्या पुस्तकावरून वाद

यातिकाकर्त्याने कोर्टात सांगितलं की, “”अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित नाही. कोणत्याही व्यक्तीला इतरांच्या भावनांचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही”. कोर्टाने यावेळी पुस्तकातील काही भाागावरुन वाद असून संपूर्ण पुस्तकावरुन नाही असं म्हटलं. “जर तुम्हाला प्रकाशकाचा परवानाच रद्द करायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे. आमच्यासमोर संपूर्ण पुस्तक नाही तर त्यातला काही मजकूर आहे,” असं कोर्टाने यावेळी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Delhi high court on plea seeking ban on congress salman khurshid book says if sentiments are hurt read something better sgy

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या