Old Rajender Nagar Incident : दिल्लीमधील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पावसाचे पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेनंतर विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यानंतर या आयएएस कोचिंग सेंटरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर दिल्ली पोलिसांनी आज सकाळी त्या कोचिंग सेंटरच्या मालकासह अन्य एका व्यक्तीला अटक केली. मात्र, दिल्लीतील या आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरामध्ये कोणतीही परवानगी घेतल्याशिवाय लायब्ररी सुरु करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली. या घटनेनंतर एमसीडीचे अतिरिक्त आयुक्त तारिक थॉमस यांनी घटनास्थळाची पाहणी करत या आयएएस कोचिंग सेंटरचे बेकायदा तळघर सील करण्यात आले आहे. याचबरोबर दिल्लीतील तळघरात चालणाऱ्या सर्व बेकायदा कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तारिक थॉमस यांनी दिली. तसेच तपास पथकाच्या माहितीनुसार, आतापर्यंत दिल्लीत तळघरांमध्ये सुरु असलेली बेकायदेशीर १३ कोचिंग सेंटर्सही सील करण्यात आले असल्याचे वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. हेही वाचा : Delhi Coaching Incident: दिल्ली IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत…” #WATCH | Old Rajinder Nagar incident | Tariq Thomas, Additional Commissioner MCD, says, "We have started the action since evening. Three basements (coaching centres running in the basement) have been closed and we will take further action in the coming days.The government has… pic.twitter.com/Al2mVx7LgE— ANI (@ANI) July 28, 2024 दरम्यान, या आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरातील घटनेत यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांशी एमसीडीचे अतिरिक्त आयुक्त तारिक थॉमस यांनी संवाद साधला. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. #WATCH | Old Rajinder Nagar incident | Delhi: "We have identified 8 coaching centres which are in the basement and among them we have sealed three of them.Compensation will be provided by the government.Action will be taken in the incident. A survey is being done.A… pic.twitter.com/HT9zfE7B1z— ANI (@ANI) July 28, 2024 या घटनेच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून आम्ही दिल्ली अग्निशमन विभागाला या इमारतीसंदर्भात आणि तळघरामध्ये सुरु असलेल्या लायब्ररीच्या संदर्भात अहवाल देण्यास सांगितले असल्याची माहितीही आयुक्त तारिक थॉमस यांनी दिली. याचबरोबर इमारतीच्या तळघरासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राजिंदर नगरमधील सर्व कोचिंग सेंटर्स सील करण्याची प्रक्रिया एमसीडीकडून सुरु करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी सांगितली. तसेच या संदर्भात दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांनीही स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. गरज पडल्यास संपूर्ण दिल्लीत ही मोहीम राबवण्यात येणारचं महापौर शैली ओबेरॉय यांनी म्हटलं. राजेंद्र नगर की दुखद घटना के बाद मेयर @OberoiShelly जी ने MCD कमिश्नर को जारी किए निर्देश ♦️ गैरकानूनी तरीक़े से Basement में चल रहे कोचिंग सेंटर्स पर सख़्त से सख़्त एक्शन लिया जाए ♦️ कल हुई दुर्घटना की जांच हो और ज़िम्मेदार लोगों पर कड़ी कार्रवाई की जाए ♦️ Basement को ग़लत… pic.twitter.com/I8QLA0s77A— AAP (@AamAadmiParty) July 28, 2024 नेमकं घटना काय घडली? दिल्लीमधील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमध्ये यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत श्रेया यादव, तान्या आणि नेविन या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. श्रेया यादव ही उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरमधील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या कोचिंग सेंटरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यानंतर दिल्लीच्या महापौर शेली ओबरॉय यांनी संबंधित कोचिंग सेंटरचे तळघर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दिल्ली पोलिसांनी आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह दुसऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात केली आहे. तसेच परवानगीशिवाय इमारतीच्या तळघरामध्ये लायब्ररी स्थापन करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.