दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत एका व्यक्तीकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या घटनेने दिल्ली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव राजपाल असल्याचे समजत आहे. पोलिसांनी राजपालकडून ३० सेमी ऑटोमेटिक पिस्तुले, एक कार्बाईन (स्टेनगन) आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली. राजपालने दिल्लीतील एका व्यक्तीला देण्यासाठी ही शस्त्रे आणली होती. संबंधित व्यक्ती ही शस्त्रे दुसरीकडे विकणार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, दुसरीकडे दिल्लीतील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या काळात शहरातील शांतता बिघडविण्यासाठी या शस्त्रास्त्रांचा वापर होणार होता का, ही शक्यताही पोलीस पडताळून पाहत आहेत. येत्या २३ एप्रिलला दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक होत आहे.