दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरील पोलीस पथकाने सोमवारी एका दागिने चोराला अटक केली. हा चोर २००५ पासून चोरीच्या घटनांमध्ये सामील होता. पूर्वी तो ट्रेनमध्ये चोरी करायचा. परंतु नतंर त्याने विमानात सहप्रवाशांच्या सामानाची चोरी करायला सुरुवात केली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय राजेश कपूर बोर्डिंग प्रक्रियेदरम्यान हँडबॅग घेऊन जाणाऱ्या वृद्ध महिला प्रवाशांना लक्ष्य करत असे. त्याचा मृत भाऊ ऋषी कपूर याची ओळख घेऊन तो प्रवास करायचा. तसंच, सावज हेरण्यासाठी तो सतत जागाही बदलत राहायचा.

अशी पकडली चोरी

एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये सतत चोरी होत असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. यूएसला जाणाऱ्या दोन प्रवाशांचे दागिने लंपास झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. सात लाख आणि २० लाख रुपये किमतीचे दागिने त्यांच्या प्रवासादरम्यान चोरीला गेले होते. हैदराबादहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये सुधराणी पाथुरीचे दागिने चोरीला गेले, तर वरिंदरजीत सिंग यांच्या अमृतसर ते राजधानीच्या ट्रान्झिट फ्लाइटमध्ये त्यांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या.

हेही वाचा >> “भाजपा ४०० पार जाणारच!” अजूनही नरेंद्र मोदी ठाम

तपासात हैदराबाद, दिल्ली आणि अमृतसर विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजचे सखोल विश्लेषण करण्यात आले. दोन्ही फ्लाइटमध्ये ऋषी कपूर नावाचा व्यक्ती उपस्थित होता, त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. जेव्हा अधिकाऱ्यांनी एअरलाइन्सकडून त्याचा नंबर शोधला तेव्हा त्यांना आढळले की तो बनावट नंबर आहे, कारण तो दुसऱ्याच्या नावाने नोंदणीकृत आहे. पोलिसांनी त्याचा मूळ फोन नंबर शोधला. त्याच्या कॉल रेकॉर्ड डिटेल्स (सीडीआर) वरून तो पहाडगंजमध्ये राहत असल्याचं समजलं. तसंच, काही मर्यादित कालावधीसाठीच तो मोबाईल सुरू करतो हेही स्पष्ट झालं.

चोराला कसं पकडलं?

त्यानंतर कपूरचा फोटो प्रसारित करण्यात आला आणि एका टीमने परिसरात शोध घेतला. या शोधामुळे त्यांना त्याच्या रिकी डिलक्स गेस्ट हाऊसचा पत्ता सापडला. चौकशीदरम्यान त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्या कबुलीजबाबामुळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह इतर मौल्यवान वस्तूंसह चोरीची महत्त्वपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. सोने चोरून तो करोलबाग येथील शरद जैन (४६) याच्याकडे देत असत. शरद जैनला याप्रकरणी अटक करण्यात आली असून दागिन्यांच्या दुकानातून वितळलेले सोने आणि हिऱ्यासारख्या वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कपूरची वर्षभराची प्रवासाची यादी पाहिली असता त्याने गेल्या वर्षभरात २०० हून अधिक फ्लाइट्समधून प्रवास केला आहे. भारतातील विविध विमानतळांवर अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये त्यांच्या सहभागाबद्दल चिंता निर्माण झाली. “राजेश कपूरने दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, चंदीगड , बेंगळुरू , बॉम्बे आणि अमृतसर सारख्या भारतातील विविध विमानतळांवर जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या अनेक विमान कंपन्यांमधील महिला प्रवाशांच्या बॅगमधून मौल्यवान वस्तू चोरल्याचेही मान्य केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi man took over 200 flights to steal jewellery and cash worth crores from co passengers arrested sgk