Delhi triple murder case: दिल्लीच्या नेब सराई परिसरात दोन दिवसांपूर्वी एका घरात एक दाम्पत्य आणि त्यांची मुलगी मृतावस्थेत आढळली होती. दाम्पत्याच्या २० वर्षीय मुलाने या हत्येची तक्रार पोलिसांत दिली होती. मात्र आता तोच या तिहेरी खूनाचा आरोपी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जून तन्वर (वय २०) याचे आई-वडिलांशी संबंध तणावपूर्ण होते. त्याच्यापेक्षा आई-वडिलांचा जीव बहिणीवर अधिक आहे, याचा अर्जूनला राग येत होता. माजी लष्कर कर्मचारी असलेले अर्जूनचे वडील त्यांची संपत्ती बहिणीच्या नावे करणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर अर्जून रागात होता. त्यातूनच त्याने तिघांचाही खून केला.

राजेश कुमार (५१), कोमल (४६) आणि त्यांची मुलगी कविता (२३) या तिघांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. बुधवारी सकाळी (४ डिसेंबर) तिघांचाही मृतदेह घरात आढळून आले होते. अर्जूनने पोलिसांना या खूनाची माहिती दिली. सकाळी ५.३० वाजता मॉर्निंग वॉकला तो गेला होता. घरी परतल्यानंतर आई-वडील आणि बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले, अशी तक्रार अर्जूनने केली होती.

murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Youth beaten with knife and koyta in Rahatani Two arrested
पिंपरी : रहाटणीत तरुणाला चाकू, कोयत्याने मारहाण; दोघे अटकेत, तिघांविरोधात गुन्हा
dead body buried
अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
police arrest two for attacking youths with koyta in bibvewadi
बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक
Father Two children dies after truck hits bike
पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय
Mother murder daughter Nagpur, Nagpur,
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून, मृतदेहाची विल्हेवाट…

दक्षिण दिल्लीतील सह पोलीस आयुक्त एसके जैन म्हणाले की, आम्ही अर्जूनला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखविल्यानंतर अर्जूनने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचे त्याच्या पालकांशी तणावपूर्ण संबंध होते. तसेच बहिणीला अधिक प्रेम देत असल्याचाही राग अर्जूनला होता.

गुन्हा कसा उघडकीस आला?

बुधवारी सकाळी अर्जूनने पोलिसांना फोन करून घरात तिघांचा खून झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. न्यायवैधक शास्त्र पथक, गुन्हे अन्वेषण पथक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. घरात दरोडा किंवा झटापटीचे कोणतेही लक्षण पोलिसांना आढळून आले नाही. पोलिसांनी जेव्हा अर्जूनची चौकशी केली, तेव्हा त्याच्या जबाबातून विसंगती समोर येत होती. तसेच तो त्याच्या जबाबात वारंवार वेगवेगळी माहिती देत होता.

हे ही वाचा >> मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल

पोलिसांनी जेव्हा चौकशीचा पवित्रा बदलला तेव्हा अर्जूनने आपला गुन्हा कबलू केला. अर्जून दिल्ली विद्यापीठात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. तो बॉक्सिंग खेळाडू असून त्याने दिल्लीचे प्रतिनिधित्व केले असून बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्यपदक जिंकलेले आहे. मात्र अभ्यास आणि रोजच्या त्याच्या वागण्यामुळे त्याचे वडील त्याला ओरडायचे, मारझोड करायचे, त्यामुळे अर्जूनचा आई-वडिलांवर राग होता. या रागातून त्याने घरातील तिघांना संपविले.

Story img Loader