Delhi MCD Election Result : भाजपा-आपमध्ये चुरस! १५ वर्षांपासूनची भाजपाची सत्ता खालसा करण्यात आपला यश येणार? | The counting of votes for the election to the Municipal Corporation of Delhi (MCD Election 2022) APP vs BJP | Loksatta

Delhi MCD Election Result: भाजपा-आपमध्ये चुरस! १५ वर्षांपासूनची भाजपाची सत्ता खालसा करण्यात आपला यश येणार?

Delhi MCD Election 2022 Result Updates : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार हे काही क्षणांत स्पष्ट होणार आहे.

Delhi MCD Election Result: भाजपा-आपमध्ये चुरस! १५ वर्षांपासूनची भाजपाची सत्ता खालसा करण्यात आपला यश येणार?
फोटो- इंडियन एक्स्प्रेस

Delhi MCD Polls Counting Result 2022 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार हे काही क्षणांत स्पष्ट होणार आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज (७ डिसेंबर) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलच्या निकालात आप पक्षाला स्पष्ट बहुमत देण्यात आले होते. मागील १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आप भाजपाची ही सत्ता खालसा करणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा >>> एक्झिट पोलचे अंदाज किती खरे किती खोटे? अरविंद केजरीवाल यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “मतमोजणी होईपर्यंत…”

रविवारी ४ डिसेंबर रोजी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत ५०.४७ टक्के मतदान झाले. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत २५० प्रभागांमध्ये एकूण १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच दिल्ली पालिकेवर कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत १.४५ कोटी मतदार आहेत.

हेही वाचा >>>हैदराबादमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १८ जणांना अटक; तब्बल १४०० महिलांची तस्करी केल्याचा आरोप!

दिल्ली पालिका भाजपासाठी महत्त्वाची

दिल्ली महापालिका भाजपासाठी राजकीय दृष्टीकोनातून खूप महत्त्वाची आहे. भाजपाची दिल्ली पालिकेवर मागील १५ वर्षांपासून सत्ता आहे. त्यामुळे यावेळीही ही सत्ता कायम राखण्याचे भाजपासमोर आव्हान आहे. तर आप पक्षाने आपले शिक्षण धोरण, मोफत वीज, आरोग्य सुविधा या मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 09:29 IST
Next Story
हैदराबादमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १८ जणांना अटक; तब्बल १४०० महिलांची तस्करी केल्याचा आरोप!